bull market boomed again| बेल्हेचा बैल बाजार पुन्हा गजबजला ; खिलार जातीच्या बैलांच्या मागणीत वाढ
बैलगाडा मालकांकडून खिलार जातीच्या बैलांची मागणी वाढली आहे. या बाजारात महाराष्ट्राच्या संगमनेर,नाशिक, लासलगाव, बीड, कल्याण, नांदेड, उस्मानाबाद तालुक्यातून शेतकरी बैलांच्या विक्रीसाठी घेऊन येतात.
पुणे- बैलगाडा शर्यतीवरील(Bullock cart race)बंदी उठल्यानंतर बैलगाडा मालक व शेतकऱ्यांमध्ये(farmer) उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शर्यतीच्या बैलांसाठी प्रसिद्ध असलेल्या बेल्हे येथील प्रसिध्द असणाऱ्या बैल बाजारात (Bull Market )खिलारी बैलांची आवक वाढली आहे. अनेक बैलगाडा मालकाकांकडून आता बैलजोडी खरेदी कारण्याकडं भर दिला जात आहे.
खिलार जातीच्या बैलाची मागणी वाढली
बेल्हे बैल बाजार बैलांची आवाक जास्त होती. मात्र बैलगाडा मालकांकडून खिलार जातीच्या बैलांची मागणी वाढली आहे. या बाजारात महाराष्ट्राच्या संगमनेर,नाशिक, लासलगाव,बीड,कल्याण,नांदेड,उस्मानाबाद तालुक्यातून शेतकरी बैलांच्या विक्रीसाठी घेऊन येतात. पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जिल्ह्यातील शर्यत प्रेमींसह , बैलगाडा मालकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
या प्रकारची बैलांच्या जातीची बाजारात आवक बैलांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेलया बाजारात गावठी,म्हैसुर, खिल्लारी,व पंढरपुरी बैलाची आवक जास्त असते.यामधे गावठी व खिलार बैलाना मागणी जास्त असते.यामधे खिल्लारी बैल वासराना प्रत्येकी 50 ते 55 हजार ते 1 लाखापर्यंत किंमत देत खरेदी केले जाते. त्यामुळे बैल बाजारात लाखाची उलाढाल झाली. या बैल बाजारात खिलार व इतर जातीच्या वासरे अशी 382 इतकी आवक झाली होती . त्यामध्ये 250 ते 275 च्या दरम्यान बैल वासराची फक्त खरेदी विक्री व्यवहार झाले होते. येत्या काळात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्याने बैल बाजार मोठ्या उत्साहानं भरतील. इतकंच नव्हे तर बैलांची खरेदी विक्रीही चांगल्या प्रकारे होईल.
Kavathe Mahankal Election : किमान समान कार्यक्रमाचं पालन केलं गेलं नाही, रोहित पाटलांचं वक्तव्य
MSEDCL : शेतकऱ्यांकडून विजबीलाची वसुली अन् सरकारकडून कृषी पंपाची जोडणी, काय आहे सरकारचे धोरण?