Pune news | देशातील सर्व प्रकारच्या कारचे कंमाड सेंटर पुणे शहरात, काय आहे Bharat NCAP

Pune Bharat NCAP | पुणे शहरात देशात सर्वाधिक वाहनसंख्या आहे. पुणे शहरात अनेक महत्वाच्या संस्थाही आहेत. आता पुणे शहरात आणखी एक संस्था सुरु झाली आहे. देशभरातील कारचे कंमाड सेंटरच त्याला म्हणता येईल.

Pune news | देशातील सर्व प्रकारच्या कारचे कंमाड सेंटर पुणे शहरात, काय आहे Bharat NCAP
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 11:18 AM

 पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात सर्वाधिक वाहने आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होत असते. परंतु आता विविध मार्गाने पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. आता त्यांनी पुणे शहरात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) सुरु केले जात आहे. या संस्थेमधून देशभरातील कारचे कमांड आणि कंट्रोल होणार आहे. या संस्थेचे उद्घाटन नितीन गडकरी यांनीच केले. काय असणार आहे भारत एनसीएपीचे काम.

काय करणार भारत एनसीएपी

भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच भारत एनसीएपीमध्ये सर्व नवीन वाहनांना स्टार रेटींग देणार आहे. वाहनांमध्ये असलेल्या सुरक्षाची रचना तपासून भारत एनसीएपी कमांड आणि कंट्रोल सेंटरमधून स्टार रेटिंग देण्याचे काम केले जाणार आहे. वाहनांमध्ये केलेल्या सुरक्षा उपययोजनेच्या आधारवर रेटिंग देण्यात येणार आहे. त्यामुळे गाड्यांना एक ते पाच स्टार रेटिंग दिले जाईल. त्यामुळे ग्राहकांना कोणत्या गाडीत कशी सुरक्षा आहे, हे समजणार आहे.

Bharat NCAP कसे करणार काम?

Bharat NCAP ॲडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (AOP), चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (COP) आणि सेफ्टी असिस्ट टेक्नोलॉजीज (SAT) या प्रकाराची पॅरामीटर्स तपासल्यावर रेटिंग देण्यात येणार आहे. त्यात फ्रंटल इम्पॅक्ट, साइड इम्पॅक्ट आणि अपघातानंतर दरवाजे उघडण्याचा अभ्यास केला जाणार आहे. वाहनांमध्ये ठेवलेल्या डमीच्या साहाय्याने समोरासमोर होणारी टक्करचा परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. ज्या पद्धतीने इलेक्ट्रीक उपकरणावर रेटिंग दिले गेले आहे, त्यामुळे त्यातील सुरक्षा आणि विजेच बचत समते, तसेच रेटिंग आता कारला दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

का पडली Bharat NCAP ची गरज

देशात कारचे क्रॅश टेस्ट केली जात होती. आता भारत एनसीएपीची गरज काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भारतात इतर देशांच्या रस्त्यांच्या तुलनेत रस्ते खूपच वेगळी आहेत. त्यामुळे भारतात वापरण्यासाठी बनवल्या जाणार्‍या गाड्यांची चाचणी भारतीय मानकांनुसार व्हावी हा उद्देश ठेऊन केंद्र सरकारने भारत एनसीएपी सुरू केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.