पुण्यात सरकारची डोकेदुखी वाढली, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचेही ‘भीक मागो’ आंदोलन

या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उतरले आहेत. कुटुंबियांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरु केले आहे. लहान मुलांसह महिला रस्त्यावर बसत थाळी वाजवून राज्य सरकारचा निषेध करत  भीक मागो आंदोलन केले जात आहे

पुण्यात सरकारची डोकेदुखी वाढली, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचेही 'भीक मागो' आंदोलन
Bhik Mago' agitation
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 1:48 PM

पुणे – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनच्या पाचव्या दिवशीही आपल्या मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत. या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उतरले आहेत. कुटुंबियांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरु केले आहे.

थाळ्या वाजवून केला सरकारचा निषेध लहान मुलांसह रस्त्यावर उतरत महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. तसेच थाळी वाजवत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत हे भीक मागो आंदोलन केले जात आहे. जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरु ठेवणार, अशी भूमिका आंदोलनात सहभागी झालेल्या कुटुंबियांनी घेतली आहे.

जर राज्य सरकारमध्ये महामंडळाचे विलीनीकरण झाले तर त्यांच्या पगारात वाढ होईल. कुटुंबाचा आर्थिक दर्जा सुधारेल. या मागण्या मान्य झाल्या तर हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येईल अशी भावना आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना असणारे तुटपुंजे पगार, अपुऱ्या आरोग्याच्या सुविधा यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना घरात सदस्य आजारी पडले योग्य उपचार देखील करता येत नाही. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची बिकट स्थिती लक्षात घ्यावी तसेच आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महिलांनी केली आहे.

आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा डाव

दुसरीकडे परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या हमीमुळं शिवाजीनगर व स्वारगेट आगारात खासगी बस सेवा सुरु झाली आहे. खासगी बस सेवेमुळं आगारात अडकून पडलेल्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई, सांगली, औरंगाबाद या शहराकडे जाणाऱ्या बसेस स्वारगेट आगारातून रवाना झालया आहेत. मात्र आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या उद्देशानं सरकार हा कट करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

हेही वाचा:  

परिवहन मंत्र्यांच्या हमीनंतर पुण्यातून खासगी बसेसची वाहतूक सुरू

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींकडे मागणी

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाचा दिलासा, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.