‘भीमा कोरेगाव विजय दिन’ हाजी मस्ताननं सुरु केला : एकबोटे

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भीमा कोरेगाव विजय दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केला नसून, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याने सुरु केला होता, असे वादग्रस्त विधान मिलिंद एकबोटे याने केले आहे. एकबोटे हा हिंदू जनजागृती समितीचा नेता आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आरोपी असून, […]

'भीमा कोरेगाव विजय दिन' हाजी मस्ताननं सुरु केला : एकबोटे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भीमा कोरेगाव विजय दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केला नसून, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याने सुरु केला होता, असे वादग्रस्त विधान मिलिंद एकबोटे याने केले आहे. एकबोटे हा हिंदू जनजागृती समितीचा नेता आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आरोपी असून, कोर्टात त्याने याच प्रकरणात प्रतिज्ञापत्र दिलं. त्यात त्याने हा वादग्रस्त दावा केला.

इतिहासकार संजय सोनवणी काय म्हणाले?

भीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटे याच्या दाव्यावर इतिहास अभ्यासकांनी टीका केली. एकबोटे याच्या विधानाचा निषेध करावा, असं आवाहन इतिहासकार संजय सोनावणी यांनी केला आहे. एक जानेवारी 1927 साली विजय स्तंभाला बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादनाला  सुरुवात केली. एकबोटे आयोगासह सर्वांची दिशाभूल करत आहे. हिंदुत्ववादी  इतिहासात काही तरी पिल्लू सोडून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप सोनवणी यांनी केलाय. एकबोटे विकृत राजकारण करत असल्याचा आरोपही सोनवणी यांनी केला आहे.

काय आहे इतिहास?

एक जानेवारी 1927 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावला विजय स्तंभाला भेट दिली होती. यानंतर नागरिक इथं येऊ लागले. 1857 बंडानंतर अस्पृश्यता समाजाची भरती बंद केली होती. मात्र यानंतर बाबासाहेबांनी भारतातील विजयात अस्पृश्याचं योगदान असल्याचं ब्रिटिशांना पटवून दिलं. त्यानंतर महार रेजिमेंट सुरु झाल्यानं अस्पृश्य समाजाला  मोठा आधार मिळाला तो यशस्वी लढा होता. 1927 पासून भिमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन सुरु झालं असून ती परंपरा कायम आहे. त्यामुळं श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न खोटारडा असल्याचे सोनवणी म्हणाले.

आनंदराज आंबेडकरांची एकबोटेवर सडकून टीका

मिलिंद एकबोटेच्या वादग्रस्त विधानावर आनंदराज आंबेडकर यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “ज्यांना इतिहास माहित नाही, ते असं बोलतात. बाबासाहेब भीमा कोरेगावला जाऊन शूरवीरांना वंदन करायचे. एक जानेवारीला 201 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातोय.”

एकबोटे संघाचं पिल्लू : राजू वाघमारे

मला वाटत मिलिंद एकबोटेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे. कारण हे जे काम आहे ते भाजप आणि आरएसएसचं काम आहे. इतिहासाची मोडतोड करणं आणि त्यांना हवा आहे तसा इतिहास समोर मांडणं. 500 महार जे 12 तास अन्न पाण्याशिवाय लढले, त्यांच्यासाठी बाबासाहेबानी भेट दिलेली. बीजेपी आणि आरएसएस यांचं काम आहे की कोणतीही गोष्ट घ्यायची आणि मुस्लिमांपर्यंत घेऊन जायची आणि लोकांच्या मनात द्वेष निर्माण करायचा म्हणून एकबोटेचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. एकबोटे हे आरएसएसचं पिल्लू आहे. या पिल्लाच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे अशा प्रकारचं धाडस हे बिथरलेलं पिसाळलेल पिल्लू आयोगासमोर  करत आहे. – राजू वाघमारे, काँग्रेस प्रवक्ते

बातमीचा व्हिडीओ :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.