राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यात गेले 2-3 दिवस चांगला पाऊस झाला, त्यामुळे परिसरातील अनेक धरणांची पाणी पातळी वाढली. तर लोणावळा शहरातील पर्यटनाचं मुख्य आकर्षण असलेलं भुशी धरणसुद्धा ओव्हर फ्लो झालेलं पाहायला मिळालं.
संग्रहित छायाचित्र.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी आदेशामुळे पर्यटकांना हा आनंद यावर्षीदेखील घेता येणार नाहीये. कोरोनामुळे मागील वर्षीपासून पर्यटनस्थळं बंद आहेत.
परिणामी भुशी धरणावर यावर्षी पर्यटक नाहीत. या वर्षी देखील पर्यटन बंदी कायम असल्याने पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे.
तरी काही प्रमाणात पर्यटन बंदी झुगारून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. पर्यटकांचं आकर्षण असलेलं लोणावळा येथील भुशी धरणावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी असताना सुद्धा अनेक पर्यटक हे लोणावळ्यात दाखल झाले आहे.