पुणे हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई

पुणे हिट अँड रन प्रकरण देशभरात चर्चेत असताना आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेनंतर लोकांचा दबाव वाढला होता. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या घटनेची दखल घ्यावी लागली. यात आणखी एक अपडेट समोर आली आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 8:14 PM

पुणे पोलीस आयुक्त यांनी आज काही वेळापूर्वी महत्त्वाची बैठक बोलावली होती. पुण्याचे अपर पोलीस आयुक्त, सर्व झोनचे पोलीस उपायुक्त या बैठकीला उपस्थित होते. पुणे शहरातील परिस्थिती तसचं झालेल्या अपघाताच्या बाबत पोलीस आयुक्त यांची बैठक झाली. आज झालेल्या कोर्टच्या सुनावणीनंतर आयुक्तांनी रीतसर आढावा घेतला. बैठकीला अपघात प्रकरणाचे सर्व तपास अधिकारी देखील उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे यादरम्यान पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे.

दोन पोलीस निलंबित

पुणे पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस ठाण्यातील २ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशा दोघांनी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

पोलिसांनी आज विशाल अग्रवाल आणि इतर आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर केले होते. या प्रकरणात विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला आधीच बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

पुण्यातील उद्योगपती विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोर्शे कारने एका बाईकला धडक दिली होती. या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी गाडीचा वेग हा ताशी 200 किमी इतका होता. घटनेनंतर आरोपीला अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव लगेचच जामीन मिळाल्याने नागरिकांना नाराजी व्यक्त केली. पण नंतर वरच्या कोर्टाने जामीन रद्द केला आणि मुलाला बाल सुधार गृहात पाठवले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आणि आरोपीवर कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलं.

पुण्यात काँग्रेसच्या वतीन कँडलमार्च

पुण्यात आज पुणेकर आणि युवक काँग्रेसच्या वतीने कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. पुणे कल्याणीनगर अपघातात मृत्यू झालेल्या अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्टा यांना न्याय मिळण्यासाठी कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील एफसी रोडवरील गुडलक चौक ते फर्गयूसन असा हा कॅण्डल मार्च काढण्यात आला होता.

राजकारण करु नये – अजित पवार

उपमुख्यंत्री अजित पवार यांनी आज म्हटले की, अशा घटनांचे राजकारण करू नये. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. अनेक शिष्टमंडळ येत आहेत. राजकारण न आणता काम केलं आहे. घटना सर्व क्रम दाखवायला तयार आहे. अपघात झाल्यानंतर गुन्हा नोंदवला गेला, जो गुन्हा नोंदवला त्याचा लोकांनी चोता केला. त्याला कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही अस काम करायला सागितले होते. माझा नेहमी चुकीच्या कामाला विरोध असतो. मी सरकारमध्ये असो वा नसो. आता कारवांई सुरू आहे त्यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.