पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, पुण्यात येतात कोठून ड्रग्ज?

Pune Crime news : पुणे शहरात गुन्हेगारी वाढू लागली आहे. गुन्हेगारीबरोबर अंमल पदार्थांची विक्री होऊ लागली आहे. उच्च शिक्षित तरुण अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे प्रकरण चार दिवसांपूर्वी उघड झाले होते. आता ड्रग्जचा मोठा साठा जप्त झालाय.

पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, पुण्यात येतात कोठून ड्रग्ज?
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 12:47 PM

पुणे : उच्च शिक्षण झाल्यानंतर कोणीही चांगली नोकरी करुन सुखाने जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु एमबीए अन् इंजिनिअरची पदवी घेतल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणारे गुन्हेगार चार दिवसांपूर्वी पोलिसांना सापडले आहे. आता पुन्हा पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचा अंमल पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. सुसंस्कृत असणाऱ्या पुणे शहरात अंमली पदार्थांचा साठा कोठून येत आहे? या प्रश्नाचे उत्तर आता पोलीस शोधत आहे.

काय झाली कारवाई

पुणे पोलीस अन् कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात ५ कोटी रुपयांचे मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ एक किलो आहे. मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे त्याचा वापर होतो. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांपूर्वी झाली होती कारवाई

29 मे रोजी एका वाहनामधून पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर 850 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते. अंमली पदार्थाचे गुन्हेगार नेमके हे अंमली पदार्थ हे कोणाला विकणार होते आणि कुठून आणले होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ऑनलाईन होत होती विक्री

ऑनलाईन ड्रग्ज विक्रीचे प्रकरण चार दिवसांपूर्वी उघड झाले होते. डंझो ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे गुन्हेगारी व्यवसाय काही जणांनी सुरु केला. पुणे शहरातील कोथरुड आणि परिसरात त्यांनी थाटला. ते एलएसडी या अंमली पदार्थांची खरेदी विक्री अ‍ॅपद्वारे करत होते. तसेच अंमली पदार्थाची घरपोहोच ऑनलाईन डिलिव्हरी करत होते. पुणे पोलिसांना हे प्रकरण उघड करत चार जणांना अटक केली होती.

हे ही वाचा

इंजिनिअर अन् इतर उच्च शिक्षितांची ऑनलाईनची शक्कल ठरली फोल, ॲपने अंमलपदार्थांची विक्री पडली महागात

Non Stop LIVE Update
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.