PCMC Election | पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नगरसेवक वसंत बोराटेंचा राजीनामा ; राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार
मोशीत ग्रीन झोन आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे रहिवाशी झोनमध्ये रूपांतर करण्याची पाच वर्षात वारंवार मागणी केली. पण, त्याला कोणी दाद दिली नाही. विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे.
पिंपरी- मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप(BJP) नगरसेवकपदाचा (Corporator)राजीनामा दिला असल्याची माहिती वसंत बोराटे (Vasant Borate)यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले, लवकरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे
मोशीत ग्रीन झोन आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे रहिवाशी झोनमध्ये रूपांतर करण्याची पाच वर्षात वारंवार मागणी केली. पण, त्याला कोणी दाद दिली नाही. विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे.
प्रशासकीय ताकद मिळाली नाही विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. तेही झाले नाही. नदी सुधार प्रकल्पात नदीच्या बाजूचा परिसर विकसित होऊ शकला नाही परिणामी विकास कामांना गती मिळाली नाही. जनतेच्या दृष्टीने अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत . मोशी, जाधववाडी भागातील लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. त्याप्रमाणात या भागातील नागरिकांना न्याय मिळाला नाही.
शेवटपर्यंत सन्मान दिला नाही
पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता. शेवटपर्यंत सन्मान दिला नाही. सन्मानाने वागविले नाही. अशीच मानसिकता आणि खदखद अनेक नगरसेवकांच्या मनात आहे. परंतु, ते स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाहीत. मोशी-जाधववाडी भागाच्या विकासासाठी, जनतेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. माझी पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे बोराटे यांनी सांगितले.
Full Moon | गली में आज चांद निकला, ‘फुल मून’ दर्शन, आज दिसणार चंद्राचे सर्वात तेजस्वी रूप
बदनापूरचे आमदार नारायण कुचेंच्या भावाची तरुणाला जीवे मारण्याची धमकी? काय आहे प्रकरण?