चंद्रशेखर बावनकुळे मैदानात…गोलंदाज कोण विचार न करता तुफान फटकेबाजी

Pune News chandrashekhar bawankule : आपल्या भाषणाने राजकीय मैदान गाजवणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी केली. पुणे शहरात क्रिकेटच्या मैदानात चंद्रशेखर बावनकुळे उतरले. त्यावेळी समोर कोण गोलंदाज आहे? हे न पाहता चौकार, षटकार मारले.

चंद्रशेखर बावनकुळे मैदानात...गोलंदाज कोण विचार न करता तुफान फटकेबाजी
chandrashekhar bawankuleImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 11:58 AM

अभिजित पोते, पुणे | 7 डिसेंबर 2023 : राजकीय मैदान गाजवणारे नेते कधी क्रिकेटच्या मैदानात उतरले तर…परंतु जे चांगले खेळाडू असतात त्यांच्यासाठी खेळपट्टी महत्वाची ठरत नाही…भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे पुणे शहरात क्रिकेटच्या मैदानात उतरले. मग नेहमी राजकीय मैदानावर गाजवणारे बावनकुळे यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. क्रिकेटच्या मैदानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तुफान फटकेबाजी केली. बावनकुळे फलंदाजी करत असताना मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे आणि इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना गोलंदाजी केली. मग आपलेच गोलंदाज असल्याचा विचार न करता बावनकुळे यांनी क्रिकेटच्या पिचवर दमदार बॅटींग केली.

भाजपचे खेळाडू खेळणार

पुणे शहरात भाजपाकडून क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप शहराध्यक्ष करंडक नावाने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. पुणे शहर भाजपातील सर्व विधानसभा मतदारसंघातील खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांची दमदार फलंदाजी केली.

हे सुद्धा वाचा

मराठा आरक्षण मिळणारच

राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरु झाले. यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे. स्पर्धेच्या उद्घघाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे मराठा समाजास आरक्षण मिळणारच आहे. फक्त कुठल्या कायद्याने हे आरक्षण देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील सगळ्या मंत्र्यांनी एकत्र आले पाहिजे. राज्यातील सर्वपक्षीय मराठे नेते आणि जरांगे यांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा फायदा कशात आहे, हे बघितले पाहिजे.

रोहित पवार यांना लवकर मोठं व्हायचंय…

माझ्या परिवारिक दौऱ्यात फोटो कापून फोटो मोर्फ करुन दाखवला गेला आहे. यासंदर्भात मी आधीच उत्तर दिले आहे आणि रोहित पवार यांना योग्य वेळी उत्तर देऊ. परंतु रोहित पवार यांना लवकर मोठं व्हायचंय आहे. त्यासाठी त्यांच्याकडे शार्टकट मार्ग आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.