बिबट सफारी Junnar बाहेर नेण्याचं वेड डोक्यातून काढावं, Asha Buchake यांची Ajit Pawar यांच्यावर टीका

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यात बिबट्या सफारीवरून (Leopard safari) राजकारण (Politics) पेटले आहे. भाजपाच्या नेत्या आशा बुचके (Asha Buchake) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

बिबट सफारी Junnar बाहेर नेण्याचं वेड डोक्यातून काढावं, Asha Buchake यांची Ajit Pawar यांच्यावर टीका
भाजपा नेत्या आशा बुचकेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 4:52 PM

जयवंत शिरतर (जुन्नर) : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यात बिबट्या सफारीवरून (Leopard safari) राजकारण (Politics) पेटले आहे. स्थानिक नागरिकही आता आक्रमक झाले आहेत. त्यातच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता भाजपाही याच्यामध्ये आली आहे. भाजपाच्या नेत्या आशा बुचके (Asha Buchake) यांनी आक्रमक पवित्रा घेत जुन्नरची ओळख ही बिबट्या असून ही बिबट सफारी 2016मधेच जुन्नर तालुक्यातच होणार असे ठरले असतानाच कोणच्या तरी मर्जीने जणूकाही जिल्ह्याचा सातबारा कोणाच्या नावाने केला आहे की काय, अशा शब्दात बुचके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. गेली पन्नास वर्षे मानव आणि बिबट्याचा संघर्ष आम्ही सोसत आहोत. त्यामुळे वारसाने आलेली ओळख बिबट सफारी शिवजन्मभूमीतच झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

‘डोक्यातून हे वेड काढून टाकावे’

पुढे त्या म्हणाल्या, की बिबट सफारी बाहेर नेणाऱ्याने डोक्यातून हे वेड काढून टाकावे. बिबट्या हा जुन्नरचा वारसा आहे, अशा शब्दांत भाजपा नेत्या आशा बुचके यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तर हा बिबट प्रकल्प येथून गेला तर तालुक्याची अस्मिता आणि उर्जा संपुष्टात येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

काय आहे वाद?

ऐतिहासिकदृष्टया महत्त्वपूर्ण तालुका म्हणून जुन्नर (Junnar) ओळखला जातो. या तालुक्यात आता बिबट्यावरून (leopard) राजकारण पेटले असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीचा पायलट प्रोजेक्ट बारामतीला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील विविध पक्ष तसेच स्थानिक नागरिकांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आहे.

आणखी वाचा :

बारामती हा बिबटचा विषय होऊ शकत नाही ; जे आमचं आहे त्याच्यावर आतिक्रमण करू नका – माजी आमदार शरद सोनवणे

Maratha बांधवांचा 23 मार्चला ‘खंजीर दिवस’, Sharad Pawar, Chandrakant Patil यांच्या घराबाहेर करणार आंदोलन

Pune : पर्यटकांची प्रतीक्षा अखेर संपली, नव्या पाहुण्यांसह Rajiv Gandhi Zoological Park उद्यापासून होणार खुलं!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.