Pankaja munde | पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत, जंगम मालमत्ता जप्त होणार का? Video

Pankaja munde | राजकारणात सध्या बॅकफूटवर असलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. साखर कारखान्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वारंवार वाढत आहेत. त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावातून पैसा गोळा करण्यास सुरुवात केली होती.

Pankaja munde | पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत, जंगम मालमत्ता जप्त होणार का? Video
Parali Pankaja Gopinath Munde on Shaivshakti Parikrama Yatra BJP Marathi News
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 9:17 AM

पुणे (प्रदीप कापसे) : भाजप नेत्या पंकजा मुंडे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल राजकीय जाणकारांकडून वेगवेगळे तर्क-विर्तक लढवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस बजावली. रक्कम भरण्याचे आदेश या नोटिशीतून देण्यात आले होते. त्याची बरीच चर्चा झाली. पंकजा मुंडे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावातून पैसा गोळा करण्यास सुरुवात केली. आता जीएसटी विभागानंतर साखर आयुक्तालयाकडून महसुली वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यात पंकजा मुंडे यांचा साखर कारखाना सुद्धा आहे. एफआरपीची रक्कम थकवली म्हणून राज्यतील संबंधित साखर कारखान्यावर कारवाई करण्याच्या साखर आयुक्तालयाच्या सूचना आहेत.

महसुली वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यातील जवळपास 31 साखर कारखान्यांनी दीड हजार कोटीची एफआरपीची रक्कम थकवली आहे. पंकजा मुंडे यांचाही कारखाना यात आहे. त्यामुळे जीएसटी नंतर आता पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर साखर आयुक्तालयाची कारवाई होणार ? असा प्रश्न विचारला जातोय. पंकजा मुंडे यांच्या व्यतिरिक्त सांगलीचे खासदार संजय काका पाटील ,काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे ,गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील, विक्रमसिंह पाचपुते या बड्या राजकीय नावांचाही समवेश आहे. कशी असते महसुली वसुली?

सारख कारखान्यांचे ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसात एआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते, तसा कायदा राज्यात आहे. 14 दिवसानंतर रक्कम दिली नाही, तर संबंधित साखर कारखान्यात साखर आयुक्तलायकडून कारवाई करण्यात येते. राज्यात जवळपास दीड हजार कोटीची एफआरपीची रक्कम थकवली आहे. साखर आयुक्तालयाने नोटीस काढली असून जिल्हाधिकाऱ्यांना महसुली कारवाईचे आदेश दिले आहेत. महसुली वसुली करतान जंगम मालमत्ता जप्त होऊ शकते.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.