PCMC Election| पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती; नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव भागाच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनी नगरसेविका पदाचा राजीनामा दिलाय. लोखंडे यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या.

PCMC Election| पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती; नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा
corporator chanda lokhande
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 5:55 PM

पिंपरी – आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे शहरात वाहू लागले आहे. विकासकामाच्या उदघाटनाबरोबरच पक्ष बदला जोर आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा (Pimpri Chinchwad Municipal Corporation)प्रभाग रचनेचा आराखडा मंजूर झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणेही बदलताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीला आठवडा भरातील दुसरा दुसरा मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव भागाच्या नगरसेविका चंदा लोखंडे (Corporator Chanda Lokhande) यांनी नगरसेविका पदाचा राजीनामा दिलाय. लोखंडे यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil)यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या राजीनाम्यामुळं चर्चेला उधाण आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप गळती लागलीय,गेल्या आठवड्यात मोशी भागाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी देखील राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. नगरसेविका चंदा लोखंडे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरसेवक वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत सर्वचा राजकीयपक्ष सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपला पहिला धक्का बसला आहे. भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. वसंत बोराटे हे 2017 साली मोशी भागातून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. स्थानिक नेत्यावर नाराज होते नगरसेवक वसंत बोराटे,नगरसेवकानी कामे करायची आणि त्याचे श्रये वरिष्ठांनी घ्याच अशा पध्दतीला कंटाळून दिला राजीनामा काल त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांकडे आपला राजीनामा दिला होता.

भाजप कडून सहकार्याचा मोठा आभाव

भाजप नेत्यांकडून सहकार्य नाही, प्रशासकीय ताकद मिळाली नाही. विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. तेही झाले नाही. नदी सुधार प्रकल्पात नदीच्या बाजूचा परिसर विकसित होऊ शकला नाही परिणामी विकास कामांना गती मिळाली नाही. जनतेच्या दृष्टीने अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत . मोशी, जाधववाडी भागातील लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. त्याप्रमाणात या भागातील नागरिकांना न्याय मिळाला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.