‘पवार नावाची कीड लागलीय, ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल’, गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका

"यांना जर मुख्यमंत्री करायचा असेल तर तीन वेगळी राज्य करावी लागतील. एक लवासा, एक बारामती, आणि एक मगरपट्टा. लवासाचा मुख्यमंत्री जयंत पाटील, लवसाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळेआणि बारामतीचा मुख्यमंत्री अजित पवार यांना करा", अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

'पवार नावाची कीड लागलीय, ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल', गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 12:07 AM

पुणे : “भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरतायत. पवार नावाची कीड लागली आहे. ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल”, अशी जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. “राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आलं नाही. हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. यांना का नाही वाटलं दुष्काळी भागात पाणी द्यावंस? हे केंद्रीय कृषी मंत्री होते. यांना राज्यात पैसा आणावंस वाटलं नाही”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी या सभेचं आयोजन केलेलं. या सभेला आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. “पुण्यात यांची सत्ता होती. मात्र त्या पुण्याची काय अवस्था आहे? वाहतूक कोंडी होते. मग का काही केलं नाही? नवीन काही करायचं नाही. फक्त आहे त्याची धार काढत बसायची”, असा घणाघात पडळकर यांनी केला.

“देवेंद्र फडणवीस एक राज्याचा असा नेता आहे जो निष्लंक आहेत. त्या देवेंद्र फडणवीसांनी जो अर्थसंकल्प मांडला ज्याने अनेक घटकांना मदत केली. मात्र अजित पवारांनी जो अर्थसंकल्प मांडला तो स्वतःची घर भरणारा होता. मग अजित पवारांना असा अर्थसंकल्प मांडावा असं का नाही वाटलं? पुणे जिल्ह्यात अशी कुठली कंपनी नाही ज्यामध्ये पवारांची भागीदारी नाही? अजित पवार त्यांच्या विधानसभा मतदारसंघाला पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत”, असा आरोप पडळकरांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘…तर तीन वेगळी राज्य करावी लागतील’

“यांना जर मुख्यमंत्री करायचा असेल तर तीन वेगळी राज्य करावी लागतील. एक लवासा, एक बारामती, आणि एक मगरपट्टा. लवासाचा मुख्यमंत्री जयंत पाटील, लवसाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळेआणि बारामतीचा मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. हे तिन्ही राज्य एकत्र करून देश करा. त्याचा पंतप्रधान शरद पवारांना करा”, अशी मिश्किल टिप्पणी गोपीचंद पडळकर यांनी केली.

“पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का? पवारांना जर कर्नाटकला मास्क घालून सोडलं तर कुणी ओळखणार नाही, बॉर्डरवर सोडलं तरी कुणी ओळखणार नाही, मात्र मोदींकडे बघा”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.