Serum Institute Fire : सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका, भाजप आमदाराकडून संशय व्यक्त
Pune Serum Institute Fire पुणे : पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला भीषण आग लागली.
Serum Institute Fire पुणे : पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला भीषण आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी इथल्या नव्या इमारतीला ही आग लागली. सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांनी व्यक्त केलेली शंका ही अत्यंत धक्कादायक आहे. आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शंका आहे का असा प्रश्न विचारुन, तशी शंका व्यक्त केली. (BJP MLA Mukta Tilak raise question and expresses doubt over Pune serum Institute Fire)
आमदार मुक्ता टिळक काय म्हणाल्या?
“दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवाने कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, असं भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.
कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेटनंबर ३,४ आणि ५ या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम?
ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग लवकरात लवकर विझवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती घेतली. संस्थेतली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश देत अजित पवारांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सांगितलं.
(BJP MLA Mukta Tilak raise question and expresses doubt over Pune serum Institute Fire)
Serum Institute Fire Video
संबंधित बातम्या
Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग