Special Report | बृजभूषण सिंह यांची महाराष्ट्रात आल्यावर राज ठाकरे यांच्याबद्दलची भाषा बदलली, म्हणाले…

उत्तर भारतातून दक्षिणेत आल्यानंतर बृजभूषण सिंहांच्या भूमिकेनंही एक टोकाहून दुसरं टोक गाठलंय. ''माफी मांगे बिना राज ठाकरे अयोध्या में पैर नही रख सकते''..असं ठासून सांगणारे बृजभूषण आता स्वतः राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तयार आहेत.

Special Report | बृजभूषण सिंह यांची महाराष्ट्रात आल्यावर राज ठाकरे यांच्याबद्दलची भाषा बदलली, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 11:53 PM

पुणे : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोधाची भूमिका बदललीय. जर राज ठाकरे अयोध्येला आले तर त्यांचं स्वागतच असेल, असं विधान भाजपचे खासदार बृजभूषण सिंहांनी केलंय. काल-परवापर्यंत राज ठाकरेंच्या माफीवर ठाम असणारे बृजभूषण अचानक का बदलले., पाहूयात हा रिपोर्ट.

उत्तर भारतातून दक्षिणेत आल्यानंतर बृजभूषण सिंहांच्या भूमिकेनंही एक टोकाहून दुसरं टोक गाठलंय. ”माफी मांगे बिना राज ठाकरे अयोध्या में पैर नही रख सकते”,असं ठासून सांगणारे बृजभूषण आता स्वतः राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तयार आहेत.

बृजभूषण सिंहांच्या इशाऱ्यावर राज ठाकरेंनी माफी मागितली नाही. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांवर उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल करण्याचा डाव असल्याचं सांगून त्यांनी अयोध्या दौरा रद्द करण्यामागचं कारण दिलं.

हे सुद्धा वाचा

अयोध्या दौऱ्याच्या १० दिवसआधीच मनसेनं पोस्टर झळकावलं होतं. राज तिलक की करो तयारी, आ रहें है भगवा धारी. याच दरम्यान आदित्य ठाकरेंचाही अयोध्या दौरा निश्चित झाला. त्यांचं पोस्टर होतं, असली आ रहाँ है. नकली से सावधान. यावर बृजभूषण सिंहांनी मनसेला इशारा दिला. उत्तर भारतीयों के सम्मान में…नेताजी मैदान में.

उत्तर म्हणून मनसेनं मुंबईत पोस्टर लावलं. राजसाहेब ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला., तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. त्यावर बृजभूषण समर्थक म्हटले की, उत्तर भारतीयोंको अपराधी कहने वाले राज ठाकरे माफी मांगो या वापस जावो. या इशाऱ्याच्या उत्तरात मनसेच्या पदाधिकाऱ्यानं जर बृजभूषण सिंह मुंबईत आले तर त्यांची तंगडी तोडण्याचा इशारा दिला.

काही महिन्यांपूर्वीच्या बॅनरवरचे हे सर्व इशारे, आव्हान, धमक्या हे सरकारी फाईलीप्रमाणे फक्त कागदावरच राहिले. याआधी उत्तर भारतीयांवरुन आरेला कारेनं उत्तर देणारी मनसे आता अतिथी देवो भवची भूमिका मांडू लागलीय.

विशेष म्हणजे बृजभूषण सिंहांचा जेव्हा पुणे दौरा निश्चित झाला. तेव्हाच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना याबद्दल न बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या. मागच्या ४ महिन्यात राज ठाकरेंनी ४ ते ५ वेळा अशाप्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

शिवसेनेचं चिन्ह जेव्हा गोठवलं गेलं तेव्हा राज ठाकरेंना पदाधिकाऱ्यांना न बोलण्याचे आदेश काढले. बृजभूषण सिंहांच्या अयोध्या वादावर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मनाई करण्यात आली.

सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेचा वाद वाढल्यानंतर राज ठाकरेंनी न बोलण्याच्या सूचना केल्या. नंतर हर-हर महादेव सिनेमाच्या वादावरही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना न बोलण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे कालच्या बृजभूषण सिंहांच्या पुणे दौऱ्याविरोधात अखिल भारतीय हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनी आंदोलन केलं. मात्र पक्षाच्या आदेशामुळे मनसे कार्यकर्ते शांत होते.

एक प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. तो म्हणजे बृजभूषण सिंहांमागे नेमकं कोण होतं? राज ठाकरेंना विरोध करताना बृजभूषण सिंहांनी पवारांचा दाखला दिला होता. त्यामुळे मनसे नेत्यांनी यामागे पवारांचा हात असल्याचं म्हटलं होतं. नंतर भाजपचेच खासदार असूनही हायकमांडचं बृजभूषण का ऐकत नाहीत., हा प्रश्न उभा राहिल्यावर मनसेनं योगी सरकारकडेही बोट दाखवलं.

तर खुद्द राज ठाकरेंनी याबाबत कुणाचंही नाव न घेता मोघमपणे भाष्य केलं. राजकीय घडामोडींमुळे भूमिका किती वेगानं बदलल्या आहेत, ते बघा.

मनसेनं 2019 साली भाजपविरोधात प्रचार केला, तेव्हा शिवसेना भाजपसोबत होती. शिवसेना 2019 शेवटी भाजपविरोधात गेली आणि मनसेची भाजपसोबत जवळीक वाढली. बिहारची सत्ता नितीश कुमार आणि भाजप 2020 मध्ये जेव्हा संयुक्तपणे चालवत होते. तेव्हा मविआनं बिहार सरकारवर टीका केली.

जेव्हा नितीश कुमारांनी 2022 मध्ये भाजपची साथ सोडून स्वतःचं सरकार बनवलं., तेव्हा आदित्य ठाकरे बिहारच्या दौऱ्यावर गेले. आणि याआधी मुंबईतल्या लोंढ्यावर बोलताना उत्तर भारतीय शब्द वापरणाऱ्या राज ठाकरेंनी अयोध्या वादावर रेल्वेचं आंदोलन हे फक्त बिहारींविरोधात होतं., असा शब्द वापरला

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे विरुद्ध बच्चन कुटुबियांत वाद गाजला होता. त्या वादाची समाप्ती ”झालं गेलं गंगेला मिळालं”., म्हणून झाली..

दरम्यान याआधी राज ठाकरेंचा विरोध वैयक्तिक पातळीवर केल्याचा दावा. बृजभूषण करत होते. त्यासाठी प्रसंगी त्यांनी भाजपविरोधात संघर्षाचीही तयारी ठेवली होती. मात्र आता त्याच बृजभूषण यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षाच्या भूमिकेकडे बोट दाखवलंय.

यावेळी राज ठाकरे विरुद्ध बृजभूषण वाद गाजला आणि जवळपास या वादाचीही समाप्ती ”झालं गेलं आणि अयोध्याच्या शरयू नदीला जाऊन मिळालं”., अशीच झालीय. नद्या फक्त मनाचा मळच नाही तर राजकीय वाद-मतभेदही धुवून काढतात. फक्त यावेळी मतभेदांबरोबरच दोन महिन्यांपूर्वी इशारे-आव्हानांचे या बॅनर्सचीही विल्हेवाट लावण्याची सोय कार्यकर्त्यांना करावी लागेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.