महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, गिरीश बापट यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
राज्यातील कोरोना हॉट्स्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. (Girish Bapat letter Narendra Modi)
पुणे : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे केंद्रासह राज्याच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना हॉट्स्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीचा पुरवठा वाढवा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे. (BJP MP Girish Bapat wrote letter to PM Narendra Modi)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी गिरीश बापट यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. त्याशिवाय 30 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरु करावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.
Make #Pune India’s first #COVID19 free city. @BJP4PuneCity elected representatives headed by Hon. @MPGirishBapat ji have written to Hon. PM @narendramodi ji to increase Pune’s quota and open-up vaccinations for above 30 yrs to help control the pandemic in the worst hit city (1/2) pic.twitter.com/ZLDFkW86gU
— Siddharth Shirole (@SidShirole) March 22, 2021
राज्यात कोरोनाचा उद्रेक
राज्यात काल दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण आढळून आले आहेत. काल नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22 लाख 34 हजार 330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 15 हजार 241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील कोरोना स्थिती
मुंबईत काल कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात काल दिवसभरात 3 हजार 260 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 223 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृत रुग्णांपैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिला रुग्णाचा समावेश होता.
पुण्यातील कोरोना स्थिती
पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभरात 2 हजार 342 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 1 हजार 789 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात काल दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुण्यात सध्या 524 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 65 आहे. (BJP MP Girish Bapat wrote letter to PM Narendra Modi)
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण, मुंबई, पुणे, नागपुरातील काय स्थिती?
मुंबईत कोरोना रोखण्यासाठी ‘मिशन टेस्टिंग’ सुरु, ‘या’ ठिकाणी होणार चाचण्या