Raosaheb Danve : राज्य सरकारच्या नियोजनाअभावी सहन करावी लागतेय कोळसाटंचाई; रावसाहेब दानवेंचा पुण्यात हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे. तर पोलीस मूकभूमिका घेत आहेत. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका दानवे यांनी केली. राज्यातले सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे असल्याचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.

Raosaheb Danve : राज्य सरकारच्या नियोजनाअभावी सहन करावी लागतेय कोळसाटंचाई; रावसाहेब दानवेंचा पुण्यात हल्लाबोल
रावसाहेब दानवेंनी दाराआडचं राजकारण थेट बाहेर आणलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 4:26 PM

पुणे : गेली एक महिना राज्यात विजेची टंचाई (Electricity shortage) आहे. या टंचाईला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना, अन्य क्षेत्रांना वीज पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र एक महिना सरकार सांगत आहे, कोळसा मिळाला नाही. रेल्वेचा रँक मिळाला नाही. असे म्हणून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. कोळशाची टंचाई केवळ नियोजनाअभावी सहन करावी लागत आहे. यासंबंधी आम्ही जानेवारीत पत्र लिहून सांगितले होते, की कोळशाचे (Coal) नियोजन करा, 15 दिवसाचे नियोजन हवे. मात्र हे तीन पक्षाचे सरकार आहे. कधी ते एकत्र बसत नाहीत. वेळ आली, की केंद्र सरकारवर खापर फोडतात. त्यांना केंद्र सरकारविरोधात बोंबलण्याचे कामच सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

‘…तरीही कोळसा थांबवलेला नाही’

3 हजार कोटी रुपये हे कोळशाचे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येणे बाकी आहे. तरीही आम्ही कोळसा थांबवलेला नाही. उन्हाळ्यात कोळसा जास्त लागतो. राज्य सरकारने कोळशाचा साठा करून ठेवायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. राज्य सरकारला मागणी आहे, की लोडशेडिंग करू नका. राज्य म्हणत असेल, की बाहेरून कोळसा आणायला परवानगी द्या तर ती आम्ही परवानगी देत आहोत. पण परवानगीची गरज नाही. राज्य सरकारने वीज खरेदी करावी आणि ती द्यावी. ते लोडशेडिंग करणार नाही म्हणत आहेत. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली लोडशेडिंग सुरूच आहे.

‘कायदा-सुव्यवस्था बिघडली’

राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. काल मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला. पोलखोल यात्रेवर दगडफेक झाली. हनुमान चालिसा म्हटली पाहिजे एवढीच त्यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे. तर पोलीस मूकभूमिका घेत आहेत. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका दानवे यांनी केली. राज्यातले सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे असल्याचे ते म्हणाले.

आणखी वाचा :

Krishna Prakash met Sharad Pawar : बदलीनंतर आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांनी गोविंदबागेत घेतली शरद पवारांची भेट

Pune Neelam Gorhe : नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई; हनुमान चालिसावरून नीलम गोऱ्हेंचा बाण

Supriya Sule : किती हल्ले झाले, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही, त्यांच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान; सुप्रिया सुळेंकडून कौतुक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.