पुण्याच्या भाजप नगरसेवकांसाठी मुंबईत दोन दिवसीय अभ्यासवर्गाचं आयोजन, भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत जाऊ नये यासाठी फिल्डिंग?

आगामी 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय घडामोडींनी वेग आला आहे (BJP organize program for Pune BJP corporaters in Mumbai).

पुण्याच्या भाजप नगरसेवकांसाठी मुंबईत दोन दिवसीय अभ्यासवर्गाचं आयोजन, भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत जाऊ नये यासाठी फिल्डिंग?
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 9:39 AM

पुणे : आगामी 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक नाराज असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन नगरसेवकांसाठी मुंबईत अभ्यासवर्गाचं आयोजन केलं आहे. स्व. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत दोन दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आलं आहे (BJP organize program for Pune BJP corporaters in Mumbai).

भाजप अभ्यासवर्गाच्या निमित्ताने नगरसेवकांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्व नगरसेवकांना भेटणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे (BJP organize program for Pune BJP corporaters in Mumbai).

19 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार?

पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतून मोठी इनकमिंग भाजपात झाली होती. मात्र यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पक्षाकडून अपेक्षित पदं न मिळाल्याने नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे.

राज्यातील राजकीय समीकरणे बदलली, अजित पवारांचा दावा

दरम्यान, अजित पवार यांनी या प्रकरणावर गेल्या आठवड्यात प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. वारं बदललं की काहीजण बदलत असतात, असं अजित पवार म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?

भाजप नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा केवळ मीडियातच आहेत. काहीतरी पुड्या सोडत असतात, चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. कोणीही भाजप सोडून जात नाही, उलट पुढील काही दिवसात आमच्याकडे काही लोक येणार आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

गिरीश बापटांची भविष्यवाणी

“पुण्यात भाजपचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. भाजपच्या सत्ताकाळात पुण्यात विकास होत आहे. त्यामुळे येत्या 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा घौडदौड करेल. भाजपने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असल्याने पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

नगरसेवक मुंबईला रवाना, त्यांच्या प्रवासाचे काही फोटो टीव्ही 9 च्या हाती

संबंधित बातमी :

पुण्यात 19 नगरसेवक भाजपा सोडणार? वाचा काय म्हणतायत गिरीश बापट

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.