Rajya Sabha Election 2022 : गंभीर आजारी असताना मुंबईतल्या राजकीय रामायणासाठी पुण्याचे ‘लक्ष्मण’ थेट विधान भवनात, नेमकं काय झालंय?

आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, नेमकी राज्यसभेची निवडणूक लागली अन् जगताप हे मतदानाला पोहोचणार का, या चर्चेला उधाण आले होते.

Rajya Sabha Election 2022 : गंभीर आजारी असताना मुंबईतल्या राजकीय रामायणासाठी पुण्याचे 'लक्ष्मण' थेट विधान भवनात, नेमकं काय झालंय?
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईत दाखल भाजपा आमदार लक्ष्मण जगतापImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:52 PM

मुंबई/पुणे : आजारी असतानाही मतदानासाठी येणाऱ्या नेत्यांमध्ये एक नाव आहे ते म्हणजे लक्ष्मण जगताप (Laxman Pandurang Jagtap). आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये (BJP) ही लढत आहे. मतदानासाठी विविध पक्षांचे आमदार विधानभवनात येत मतदान करीत आहेत. एकही आमदार अनुपस्थित राहू नये, मत वाया जाऊ नये यासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न आहेत. तसेच प्रयत्न भाजपानेदेखील केले आहेत. भाजपाचे एक आमदार आज रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले. लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) मतदान प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. आजारी असल्याने ते मतदानाला येणार नाहीत, असा कयास बांधला जात होता, मात्र अखेर त्यांनी मतदानप्रक्रियेत भाग घेतला.

नेमके काय झाले?

आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, नेमकी राज्यसभेची निवडणूक लागली अन् जगताप हे मतदानाला पोहोचणार का, या चर्चेला उधाण आले. बऱ्याच चर्चेनंतर ते एअर अॅम्ब्युलन्सने जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर आज ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बायरोड पुण्याहून मुंबईत दाखल झाले.

उपचार सुरू

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजार ग्रस्त आहेत. दीड महिने त्यांच्यावर खासगी रुग्णालयार उपचार सुरू होते. 2 जूनला त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला होता. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाची ताकद वाढल्याच बोलले जात आहे. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच बिगुल वाजला अन् आजारी असणाऱ्या नेत्यांना मुंबईत कसे आणायचे याची चर्चा वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू झाली. जगताप यांनी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणले जाणार असल्याची चर्चा होती. परंतु, हवामान बदलामुळे त्यांना बायरोड रुग्णवाहिकेतून मुंबईला पाठविण्यात आले. त्यांच्यासोबत अत्याधुनिक रुग्णवाहिका, डॉक्टरांची टीम आहे.

हे सुद्धा वाचा

अॅम्ब्युलन्समधून मुंबईत दाखल लक्ष्मण जगताप

‘पक्षाला माझी गरज’

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार, पक्षाला आपली गरज आहे. आपण जायला हवे. सध्या प्रकृती ठीक असे जगताप म्हणाले. त्यानंतर त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी होकार दिला आणि ते आज रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले. राज्यसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेतही त्यांनी भाग घेतला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.