PCMC Election | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमधली गळती थांबेना ; भाजपाच्या आणखी दोन नगरसेवकांनी दिले राजीनामे
पिंपरी चिंचवड भाजप मधील आतापर्यंत सहा नगरसेवकानी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाला मोठी गळती सुरु असल्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप आपला गड शाबूत कसा ठेवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) भाजपला(BJP) लागलेली गळती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांनी (BJP corporators)राजीनामा देण्याचे सत्र सुरु ठेवले आहेत. आज भाजपाच्या आणखी दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भोसरी प्रभागाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे,चिखली प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे यांनी राजीनामा दिला आहे. पिंपरी चिंचवड भाजपमधील आतापर्यंत सहा नगरसेवकानी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाला मोठी गळती सुरु असल्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप आपला गड शाबूत कसा ठेवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आतापर्यंत ‘यांनी’ दिले राजीनामे
आगामी महानगरपालिकेची महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आरखडा जाहीर झाला त्यानंतर पिंपरतील भाजपला एकामागून एक धक्के बसू लागले. सुरुवातीला भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपाला रामरामकरत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नगरसेवक तुषार कामठे यांनी आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर आता या दोघांनी आपला राजीनामा आयुक्तांकडे सोपवला आहे. हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर मात्र भूमिका दोन दिवसांनी स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘या’ गोष्टीची भीती
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला लागलेल्या गळतीचे मुख्य कारण काय असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. पक्ष सोडण्याचं निर्णय घेण्यामागे नेमका पक्ष कारणीभूत आहे का? नव्या तयार झालेली प्रभाग रचना. आपला मतदार संघ बांधून ठेवण्यासाठी तसेच मजबूत करण्याच्या दृष्टी कोनातून ही पावले उचलली जात आहेत का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
यूट्यूबर गणेश शिंदेंनी बायकोचं स्वप्न पूर्ण केलं, योगिता शिंदेंना घेऊन गेले ‘या’ विशेष ठिकाणी
VIDEO : Nawab Malik कौन है? देश का गद्दार है, विधानभवनाच्या पायऱ्यांवर BJP ची घोषणाबाजी