Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात बावनकुळे यांनी मांडले भाजपचे आगामी व्हिजन, रणनीती सांगत केली पुणे भाजपात बदलाची घोषणा

Pune BJP Meeting : पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशकार्यकारणीची बैठक आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आले आहेत. बैठकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध विषयांवर त्यांनी आपली भूमिका मांडली.

पुण्यात बावनकुळे यांनी मांडले भाजपचे आगामी व्हिजन, रणनीती सांगत केली पुणे भाजपात बदलाची घोषणा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 1:41 PM

अभिजित पोते, पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुणे शहरात होत आहे. या बैठकीपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पक्षाची आगामी धोरणे आणि होणारे बदल याची माहिती दिली. त्याचवेळी विरोधकांना घेरले. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय हा केवळ आश्वासनांचा विजय आहे. कर्नाटक काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पैसा कुठे आहे? असा सवाल त्यांनी केला.

बैठकीला २०० पदाधिकारी

भाजपच्या बैठकीसाठी राज्यभरातून २०० च्यावर पदाधिकारी आले असल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारने १० महिने जे कामे केली आहेत, त्या कामांचा अभिनंदनचा प्रस्ताव आम्ही मांडत आहोत. तसेच महाविजय २०२४ चा संकल्प आम्ही करत आहोत. भाजप-सेना युती राज्यातील सगळ्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यत राज्य सरकारचे यश

सर्वोच्च न्यायालयाने आज बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. हे राज्य सरकारचे यश आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील बाजू भक्कमपणे न्यायालयासमोर आणली. त्याबद्दल शिंदे- फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो, त्यांचं आभार मानतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.

३५ लाख कार्यकर्ते काम करणार

राज्यभरात पक्षाचे ३५ लाख कार्यकर्ते काम करणार आहे. आम्ही कागदावर कधीचं बोलत नाही. आम्ही करुन दाखवतो. पुणे कसबा मतदार संघातील पराभव हा तीन विरुद्ध एक असा होता. भाजपला पराभूत करण्यासाठी तिन्ही पक्ष होते. पण आता युती म्हणून आम्ही तयार आहोत. राज्यात आमच सरकारं काम करत आहे. जनता भुलथापला बळी पडणार नाही. जनतेचा फडणवीस मोदी अणि शिंदे यांच्यावर विश्वास आहे.

पुण्यात मोठे बदल

कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत. येत्या ३० तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय हा आश्वासनांचा आहे. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी पैसा कोठून येणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अनेक नेते भाजपात

२०२४ पर्यंत भाजपात अनेक मोठे नेते येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्यात यामुळे राजकीय भूकंप झालेला असेल. लवकरच खूप मोठी नावे समोर येणार आहेत.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.