कसबा पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट; प्रवीण दरेकर यांनी सांगितली कारणं
पक्षापेक्षा उमेदवार जनतेने पाहिला. उमेदवार केंद्रीत अशाप्रकारची ही निवडणूक झाली. विजयाचा कल रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने दिसत आहे.
पुणे : प्रवीण दरेकर हे भाजपमधील विधान परिषदेचे गटनेते आहेत. कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे आठ दिवस तळ ठोकून होते. प्रत्येक सभेत ते हजर होते. रवींद्र धंगेकर यांच्याकडे सहा हजारांचे लीड आहे. या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले, कसब्याची निवडणूक ही रवींद्र धंगेकर या उमेदवारांवर होती. अपार कष्ट घेतले. ही निवडणूक वनसाईड होईल, अशी परिस्थिती होती. पण, भाजपने घेतलेल्या मेहनतीमुळे ही अटीतटीची अशी निवडणूक होताना दिसत आहे. पक्षापेक्षा उमेदवार जनतेने पाहिला. उमेदवार केंद्रीत अशाप्रकारची ही निवडणूक झाली. विजयाचा कल रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने दिसत आहे.
२८ वर्षांनंतर भाजपच्या हातून कसबा गेले
धंगेकर यांची सहा हजारांची लीड आहे. विजय हा विजय असतो. हेमंत रासने हे जिंकण्याची भाजपला आशा होती. यासाठी भाजपने मोठी शक्ती पणाला लावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचारात उतरले होते. मंत्र्यांची फौज रासने यांच्या प्रचारासाठी आली होती. २८ वर्षांपासून कसबा हे भाजपकडे होतं. पण, ते आता भाजपची पिछेहाट सुरू आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले, निवडणुका या ताकदीने लढायच्या असतात. लोकांनी ही निवडणूक पक्षाकडे नेण्यापेक्षा व्यक्तीकडे नेली. व्यक्तीफरकामध्ये जनतेने रवींद्र धंगेकर यांना पसंती दिली आहे. धनशक्तीचा कुठंही वापर झाला नाही. कुठंही धनशक्तीचा वापर झाला नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली. व्यक्तीकेंद्रीत मतं जास्त होती. ती धंगेकर यांना मिळाली.
निवडणूक व्यक्तीकेंद्रीत
कसब्यात कोणत्याही गोष्टीवर विश्लेषण करणे कठीण आहे. कुठल्याही विषयावर भाष्य करणे योग्य नाही, असं त्यांनी म्हंटलं. हेमंत रासने यांच्यासाठी ते मैदानात उतरले होते. पण, निकाल रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने दिसून येतो. हेमंत रासने पिछाडीवर आहेत. ही निवडणूक पक्षकेंद्रीत न होता व्यक्तीकेंद्रीत झाल्याचा दावा आता प्रवीण दरेकर यांनी केला आहे. भाजपने मोठा फौजफाटा लावूनही काही फायदा होताना दिसला नाही.