Pune News : पुणे दहशतवाद्यांच्या फ्लॅटवर बॉम्ब बनवण्याचे सर्किट, केमिकल अन् काय केले जप्त

Pune Crime News : पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना १८ जुलै रोजी अटक झाली होती. हे दहशतवादी दीड वर्षांपासून फरार होते. एनआयएने त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. आता एटीएसने त्यांच्या फ्लॅटवरुन मोठा साठा जप्त केला आहे.

Pune News : पुणे दहशतवाद्यांच्या फ्लॅटवर बॉम्ब बनवण्याचे सर्किट, केमिकल अन् काय केले जप्त
pune terrorist
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 11:14 AM

पुणे | 1 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात नुकतेच दोन दशतवादी पकडले गेले होते. एनआयएच्या लिस्टमधील दहशवादी पुणे शहरात दीड वर्षांपासून राहत होते. जयपूरमधील सीरियल ब्लास्ट करण्याचा कटामधील ते आरोपी होते. त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पुणे पोलिसांनी या दोघांना पकडल्यानंतर तपास पुणे एटीएसकडे दिला आहे. त्यानंतर या दोघांना मदत करणाऱ्या अन् त्यांना घर भाड्याने देणाऱ्या आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणी एटीएसने त्यांच्या फ्लॅटवरुन मोठा ऐवज जप्त केला आहे.

काय काय केला जप्त

पुणे पोलिसांनी इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना अटक केली. परंतु त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज (वय ३२) फरार झाला. आता हे राहत असलेल्या ठिकाणी एटीएसने कारवाई केली आहे. ATS ला त्यांच्या फ्लॅटमधून 500 जीबी डेटा मिळाला आहे. त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. हा 500 gb डाटा FSL कडे पाठवण्यात आला आहे.

तसेच ATS ला या फ्लॅटवर बॉम्ब निर्मितीचे सर्किट मिळाला आहे. या दहशतवाद्यांनी बॉम्बची चाचणी जंगलांमध्ये केली होती. काही रसायनसुद्धा त्यांच्या फ्लॅटमध्ये मिळाले. रासायनिक पावडर, चारकोल, थर्मामीटर, ड्रॉपर, सोल्डरिंग गन, मल्टीमीटर, छोटे बल्ब, बॅटरी, अलार्म घड्याळ आणि मोटरसायकल चोरीसाठी वापरण्यात येणारे स्पॅनर या ठिकाणी मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

रत्नागिरीतून अटक केलेल्या…

एटीएस अधिकाऱ्यांना सांगितले की, या प्रकरणातील चौथा आरोपीस एटीएसने रत्नागिरीवरुन चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर त्याला अटक केली. त्याने ज्या ज्या ठिकाणांवरुन सामग्री खरेदी केली, ते दाखवले. तसेच त्यांच्याकडून मुंबईतील चबाड हाउसचे फोटोही जप्त केले. चबाड हाऊस परिसरातसुद्धा 26/11 मधील हल्ला झाला होता.

आरोपींचा होता शोध सुरु

राजस्थानमध्ये बॉम्ब स्फोट प्रकरणात इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांचा शोध सुरु होता. परंतु गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते. यामुळे पाच लाखांचे बक्षीस त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने जाहीर केले होते. हे दहशतवादी आयसिसी या संघटनेची शाखा असलेल्या सुफा संघटनेशी संबंधित होते. पुणे पोलिसांनी एका मोटरसायकल चोरी प्रकरणात त्यांना अटक केली होती.

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.