Rashmi Shukla : रश्मी शुक्लांवर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई नको, हायकोर्टाकडून फोन टॅपिंग प्रकरणी दिलासा
राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना उच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत.
पुणे: राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकऱणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची (phone tapping case) चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court ) रश्मी शुक्ला यांना दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करु नका, अशा सूचना उच्च न्यायालयानं दिल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रश्मी शुक्ला यांना दिलासा
राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना उच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत.
एफआयआर रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला न्यायालयात
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात एफआयर दाखल झाला होता. दाखल एफआयार रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
फोन कशासाठी टॅप केले ते लवकरच समोर येईल
काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याचा अहवाल आला आहे. मागे त्या चौकशीसाठी आल्या नव्हत्या. ते प्रकरण वेगळं आहे. हे प्रकरण वेगळं आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जातं आहे. परंतु, असं काही नाही. याबाबतचा अहवाल आला आणि त्यानंतर ही करवाई झाली आहे. सार्वजनिक सुरक्षे अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करायची परवनगी दिली जाते. परंतु, या प्रकरणात फोन टॅप करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. त्यामुळें ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी फोन कशासाठी टॅप केलें हे लवकरच समोर येईल, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं होतं.
इतर बातम्या:
नितीन गडकरींनी दिले मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत संकेत, नागपुरातील अनेक नगरसेवक धास्तावले!
IND vs SL 1st Test: क्षणभर कोहलीलाही नाही समजलं, विराट बोल्ड झाला ‘त्या’ अप्रतिम चेंडूचा पहा VIDEO