Pune rain : मंकी हिल रेल्वे मार्गावर पुन्हा कोसळली दरड; मधल्या लेनवर पडल्यानं वाहतुकीवर परिणाम नाही
पुढचे काही दिवस पाऊस बरसतच राहणार असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता सतर्कतेचे आवाहन आणि खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोणावळा, पुणे : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मंकी हिल्सजवळ पुन्हा दरड कोसळली (Boulders fall) आहे. रेल्वे इंजिनमध्ये मोठा दगड अडकल्याने रेल्वे इंजिन रुळावरून खाली उतरले आहे. पहाटेच्या सुमारास ही दरड 117/33 A किलोमीटरवर कोसळली असून, ही दरड मधील लेनवर पडल्याने रेल्वे (Railway) वाहतुकीवर कुठलाही परिणाम नाही. मंकी हिल्स रेल्वे मार्ग (Monkey Hill) हा डोंगरातून जातो. याठिकाणी वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. सध्या पाऊस सुरू असल्याने अशा घटना अधिक प्रमाणात घडून येत असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्याच्या, डोंगराळ भागात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. सध्या जिल्ह्यातील घाट माथ्याच्या परिसरात मुसळधार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. दरम्यान, पुढचे काही दिवस पाऊस सुरूच राहणार आहे.
दहा दिवसांतली दुसरी घटना
गुरुवारी (ता. 11 ऑगस्ट) मध्यरात्री मंकी हिल ते ठाकूरवाडी यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील अप दिशेच्या ट्रॅकवर ही दरड कोसळली होती. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेक एक्स्प्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी तातडीने मदतकार्यालादेखील सुरुवात झाली होती. आता सततच्या पावसामुळे पुन्हा दरड कोसळली आहे. मात्र वाहतुकीला यामुळे अडथळा निर्माण झालेला नाही. विकेंडमुळे साधारणपणे शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान अनेक जण मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, मध्यरात्री या घाट परिसरात दरड कोसळळ्याने रेल्वे वाहतूक कोलमडली होती. अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली होती.
खबरदारीच्या सूचना
घाट माथ्याच्या परिसरात प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मंकी हिल, ठाकूरवाडी यादरम्यानचा परिसर त्याचप्रमाणे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जुना मार्ग याठिकाणांहून प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने प्रवाशांना केले आहे. पुढचे काही दिवस पाऊस बरसतच राहणार असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता हे आवाहन आणि खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे अपघाताच्या घटना