Brahman Mahasangh Vs NCP : ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीत पुण्यात राडा! अमोल मिटकरींच्या विरोधात घोषणाबाजी, राष्ट्रवादीचंही प्रत्त्युत्तर
ब्राम्हण महासंघाने (Bhahman Mahasangh) राष्ट्रवादीविरोधात आंदोलन पुण्यात आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol mitkari) यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा दिसून आला. मिटकरी मानसिक रुग्ण आहेत, असा हल्ला यावेळी ब्राह्मण महासंघाने केला आहे.
पुणे : ब्राम्हण महासंघाने (Bhahman Mahasangh) राष्ट्रवादीविरोधात पुण्यात आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol mitkari) यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा दिसून आला. मिटकरी मानसिक रुग्ण आहेत, असा हल्ला यावेळी ब्राह्मण महासंघाने केला आहे. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरी यांनी विधान केले होते. मात्र यामुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला. यावेळी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला राष्ट्रवादीनेही विरोध केला. अमोल मिटकरींच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे प्रत्त्युत्तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले. त्यामुळे गोंधळ उडाला. मंत्राचा चुकीचा अर्थ मिटकरी यांनी सांगितला आहे. दरम्यान, अमोल मिटकरींवर कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे या कार्यकर्त्यांनी केली आहे.
‘अश्लील घोषणा सहन करणार नाही’
अश्लील घोषणा जर त्यांनी दिलेल्या असतील तर त्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. नेत्यांबद्दल वाईट घोषणा देणार असाल, तर कुणीही हे सहन करणार नाही. मिटकरींची भाषा आणि भाषाशैली योग्यच आहे. अमोर मिटकरींचे भाषण हा त्यावेळचा एक विनोद होता. मात्र महाराष्ट्रात आज काल विनोद बुद्धी राहिलेली नाही. राजकीय रंग देऊन, इश्यू करून त्याचे फायदे घ्यायचे धंदे सुरू आहेत, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.