वाद वाढणार, छगन भुजबळ यांच्या कानाखाली लावणाऱ्यास एक लाख रुपये देणार, कोणी केली घोषणा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या त्या वक्तव्यानंतर राज्यात वाद वाढत आहे. एका संघटनेने त्यांच्या कानाखाली लावणाऱ्यास एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

वाद वाढणार, छगन भुजबळ यांच्या कानाखाली लावणाऱ्यास एक लाख रुपये देणार, कोणी केली घोषणा?
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 2:26 PM

पुणे | 20 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानानंतर वाद वाढणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात, असे वक्तव्य भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले होते. तसेच काही जणांना सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिले नाही. आमचे शिक्षण झाले ते महापुरुषांमुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले करुन दिली, असे भजबळ म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.

पुण्यात काय झाली घोषणा

जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. यापूर्वीही छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती. ते सातत्याने हिंदू समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करीत आहेत. विशिष्ट समाजाचा विरोधात गरळ ओकतायेत. त्यांनी कोणाची पुजा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु समाजात तेढ निर्माण करु नये, असे परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ संतापले

सरस्वती आणि शारदा देवीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ नाशिकमध्ये रविवारी मीडियावर भडकले. तुम्ही एक बाजू सांगता, तशी दुसरी पण माझी बाजू असते. ती दुसरी बाजू मांडणार असाल, तरच यापुढे मी तुमच्याशी बोलेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. सरस्वती आणि शारदा देवी हे आमचे देव आहे, त्यांची पूजा केली पाहिजे. परंतु शिक्षणाची दारे आपल्याला फुले दाम्पत्य, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी उघडी करुन दिली.

भूमिका बदलणार नाही

मी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून भूमिका बदलेल, असे काही नाही. आमची जी भूमिका आहे, ती बदलणार नाही. यात कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असे भुजबळ यांनी म्हटले.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.