Pune news : पर्यटकांचे मोबाईल पळवणार जेरबंद, पोलिसांनी केले लाखोंचे मोबाईल जप्त

Pune Cirme News : देशभरातून पर्यटन स्थळी येणाऱ्या लोकांचा मोबाईलची तो चोरी करत होता. पोलिसांकडे सातत्याने यासंदर्भातील तक्रारी येत होत्या. अखेर तो पोलिसांच्या सापळ्यात आला.

Pune news : पर्यटकांचे मोबाईल पळवणार जेरबंद, पोलिसांनी केले लाखोंचे मोबाईल जप्त
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 12:36 PM

रणजित जाधव, लोणावळा, पुणे | 21 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या पुणे जिल्ह्यात देशभरातून पर्यटक येतात. पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा ही गावे पर्यटनाचे माहेरघर आहे. लोणावळ्यात दरवर्षी वर्षाविहारसाठी पर्यटकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन किंवा गाड्यांमध्ये ठेवलेले मोबाईल चोरुन नेणारा पोलिसांच्या सापळ्यात आला आहे. त्या व्यक्तीकडून लाखो रुपये किंमतीचे शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या आरोपीकडून आणखी इतर गुन्हेही उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण आहे मोबाईल चोरणारा चोरटा

राज्यभरातून वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांचे मोबाईल कारमधून चोरीला जात होते. पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पसार होत होता. यासंदर्भातील तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. यामुळे या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आरोपी अखिल सलीम व्होरा हा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

हे सुद्धा वाचा

कितीचा माल केला जप्त

लोणावळा पोलिसांनी आरोपी अखिल सलीम व्होरा याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून बारा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शेकडो मोबाईल त्याच्याकडे होते. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून आरोपी अखिल गाड्यांमधील मोबाईल अन् रोख रक्कम इतर मौल्यवान वस्तू आणि पर्स चोरून पळ काढायचा. अखेर त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

पर्यटकांमध्ये समाधान

एकीकडे वर्षाविहाराचा आनंद घेणारे पर्यटक चोरीच्या घटनांमुळे वैतागले होते. या घटनांमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडत होते. पर्यटकांकडून चोरी केलेल्या मालावर मौजमजा करणारा हा चलाख चोर लोणावळा पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. पोलिसांनी त्याला चार चाकीसह जेरबंद केले.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.