“थोडक्यात वाचलो, अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती”; अजित पवार यांनी सांगितला तो थरारक प्रसंग
लिफ्टमध्ये बसलो. लिफ्ट वर जाईना. तिथचं बंद झाली. नंतर लाईट गेली. अंधार होता. नंतर ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून धाडदिशी खाली आहे.
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची लिफ्ट काल चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. ही घटना कालची आहे. बारामती येथील उद्घाटन प्रसंगावेळही ही घटना आहे. थोडक्यात वाचलो अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. काल नेमकं काय घडलं ते अजित पवार यांनी कार्यक्रमात आज सांगितलं. अजित पवार म्हणाले, काल १४ तारीख होती. काल कुठं बोललो नव्हतो. तुम्ही आता घरचे आहात म्हणून बोलतो. काल मी सकाळी एका हॉस्पिटलचं (Hospital) उद्घाटन केलं. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट घेऊन जात होतो. तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात होतो. सोबत डॉ. हार्डिकर होते. त्यांच ९० वर्षे वय आहे. सोबत सेक्युरिटी ऑफिसर होते. लिफ्टमध्ये बसलो. लिफ्ट वर जाईना. तिथचं बंद झाली. नंतर लाईट गेली. अंधार होता. नंतर ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून धाडदिशी खाली आहे. खोट सांगत नाही. आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता, असंही त्यांनी म्हंटलं.
नाहीतर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती
सेक्युरिटी ऑफिसरनं दरवाजा तोडला. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. पण, बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितलं नाही. मी घरी पत्नीलापण बोललो नाही. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालचं ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. तुम्ही घरची माणसं आहेत. त्यामुळं तुम्हाला सांगतो, असंही अजित पवार म्हणाले.
चौथ्या मजल्यावरून धाडदिशी लिफ्ट कोसळली
सांगायचं तात्पर्य आपण आपली काळजी घेतली पाहिजे. परमेश्वराची कृपा तुमचे आशीर्वाद. चौथ्या मजल्यावरून धाडदिशी लिफ्ट आदळलं. पण, आम्ही काही झालंच नाही, असं सांगितलं. ते स्ट्रेचर देणारे लिफ्ट होते. नंतर आम्ही बाहेर पडलो. हार्डीकर डॉक्टर यांना थोडसं लागलं. मात्र, सर्व सुखरूप आहोत.
रात्री प्रवास करणे धोक्याचे
आज अकरापर्यंत मुंबईला पोहचायचं आहे.कारण रात्री प्रवास केल्यावर कसे अपघात होतात, तुम्ही बघताय. विचारता काही सोय नाही, असंही अजित पवार म्हणाले. कालच्या घटनेचा अजित पवार यांनी चांगलाच धसका घेतला होता.