पुणे हादरलं! भीमा नदीपात्रात आढळला मृतदेह; डोके, हात-पाय शरीरापासून केले होते वेगळे

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुणे हादरलं! भीमा नदीपात्रात आढळला मृतदेह; डोके, हात-पाय शरीरापासून केले होते वेगळे
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 3:35 PM

पुणे : इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी इथं एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बावडा गावानजीक असणाऱ्या गणेशवाडीच्या शिवारातील पुलाखाली भीमा नदीच्या पात्रात 25 ते 30 वय असणाऱ्या युवकाची डेड बॉडी आढळून आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Brutal murder of youth separation of head hand and legs from body in pune)

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली असून शरीरापासून मुंडके, हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे केले आहेत. अशा परिस्थितीत ही बॉडी आढळून आल्याने इंदापूर तालुक्यात भीतीचं वातावरण आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे? आणि ऐवढ्या क्रुरतेने हत्या कोणी आणि का केली? याचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना युवकाचा मृतदेह दिसताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात सध्या युवकाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून स्थानिकांशी आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर क्रुरतेने संपूर्ण शरीराचे तुकडे केल्यामुळे ओळख पटवणं कठीण जात असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. (Brutal murder of youth separation of head hand and legs from body in pune)

संबंधित बातम्या – 

नागपूर शहर ड्रग्ज तस्करीचा नवा अड्डा?, नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

नागपुरात पाच जणांकडून गळा चिरुन तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

(Brutal murder of youth separation of head hand and legs from body in pune)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.