Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक
राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे.
पुणे : राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे. घटनास्थळी राजगुरूनगर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. मात्र चाऱ्याला लागलेली आग आटोक्यात आणताना भिजल्याने संपूर्ण खराब झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी जास्त थंडी तर कधी उन्हाचा चटका… यामुळे पीकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होतो. आता पीकांसोबत वैरण म्हणजेच गुरांना खाण्यासाठीचा चाराही यालाही उन्हाचा फटका बसला आहे.
वाढत्या उन्हामुळे घडली घटना
शेतात शेतकऱ्यांनी गुरांसाठी वैरण ठेवलेले असते. सध्या प्रचंड ऊन वाढले आहे, काही ठिकाणचा पारा 40-42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. माणसांनाही या उन्हाचा तडाखा बसला आहे, तिथे गुरांची परिस्थिती वेगळी काय असेल? गुरांसाठीचे वैरण शेतकऱ्यांनी शेतातच वेगळे ठेवलेले असते. त्याला आग लागली.
#Pune : दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेले वैरण जळून खाक झाले आहे.#fodder #Cattle #Video अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/VXLH7AISDl
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 9, 2022
वैरण भिजले
अग्निशामक दलाला बोलावून आग काही प्रमाणात विझवली खरी, मात्र पाण्याचा मारा केल्याने वैरण भिजले आहे. त्यामुळे ते पूर्ण खराब झाले आहे. शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.