रक्षाबंधनला पुणे मेट्रो अन् बस सेवेला कसा होता प्रतिसाद, किती जणांनी केली मेट्रो सफर
Pune News : रक्षाबंधन निमित्त बुधवारी सार्वजिनक सुटी होती. त्यासाठी पुणे मेट्रो आणि शहर वाहतूक बससेवेला नागरिकांनी कसा प्रतिसाद दिला...पुणे शहरातील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा कधी बंद राहणार बंद...महत्वाच्या बातम्या जाणून घ्या...
पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात रक्षाबंधनानिमित्त मेट्रो आणि शहर बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर PMPL चे उत्पन्न 1 कोटी रुपयांच्यावर गेले आहे. PMPL प्रशासनाकडून बुधवारी रक्षाबंधनानिमित्त जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. पुणे अन् पिंपरी चिंचवड शहरात PMPL च्या 1930 बस धावल्या. या बसेसमधून 14 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे पुणे मनपाचे उत्पन्न एक कोटी रुपयांवर गेले आहे.
रक्षाबंधनाला पुणे मेट्रो सुसाट
रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेक नागरिकांनी मेट्रो आणि पीएमपीने प्रवास केला .मेट्रोच्या पीसीएमसी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गावर १० हजार ४९१, तर वनाज ते रूबी हॉल मार्गावर १३ हजार ४२२ प्रवाशांनी प्रवास केला. एकंदरीत पुणे मेट्रोला पुणेकरांनी रक्षबंधनाच्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला.
पुणे मनपाच्या या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद
आळंदी शहराचा पाणी पुरवठा आज आणि उद्या (३१ ऑगस्ट आणि १ स्पटेंबर) रोजी बंद राहणार आहे. पुणे महानगर पालिकेकडून भामा आसखेड धरणावरून पाणी पुरवठा होणाऱ्या कुरळीमधल्या पंपिंग स्टेशनचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पुणे शहरात वीज पुरवठा राहणार बंद
पुणे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी दिवसभर बंद राहणार आहे. पर्वती वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा आज बंद राहणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील मुख्य भागाचा वीज पुरवठा करण्यात खंडित करण्यात येणार आहे. सिंहगड रस्ता, दत्तवाडी, नवी पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट या भागातील वीज पुरवठा गुरुवारी दिवसभरासाठी बंद असेल.
पुणे देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डासंदर्भात असा निर्णय
देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. त्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्याधिकारी यांनी अहवाल पाठवला आहे. मात्र देहूरोडमधील काही नागरिकांनी याला विरोध दर्शविला आहे.