पुणे शहरात चालले तरी काय? भर रस्त्यात तलवारीने केक कापला, व्हिडिओ व्हायरल

Pune Cirme News : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारी टोळ्या विविध माध्यमातून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता भर रस्त्यात तलवारीने केक कापून दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात चालले तरी काय? भर रस्त्यात तलवारीने केक कापला, व्हिडिओ व्हायरल
Pune Crime
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 12:35 PM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे. शहरातील वातावरण चांगले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक अधिकारी अन् उद्योजक पुणे शहरात राहतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचे वातावरण बदलले आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेत नाही. कोयता गँगची दहशत पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून आहे. यासंदर्भात काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुणे शहरात दहशत निर्माण करण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

भर रस्त्यात केक कापला

पुणे शहरातील सहकार नगरमधील ही घटना आहे. या ठिकाणी गुन्हेगारी टोळीने पुन्हा धुडगूस घातला आहे. भर चौकात गाडी आडवी लावत होता “भाईचा” वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरातील दहशत निर्माण करणारा हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी वाहनांची तोडफोड

सहकार नगर परिसरात गुन्हेगारी टोळीकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. ही घटना नुकतीच घडली होती. त्याबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक प्रकार घडला आहे. यासंदर्भातील व्हिडिओसमोर आला आहे.

काय आहे व्हिडिओत

सहकार नगरमधील एका चौकात टोळक्याने गाडी आडवी लावली. त्यानंतर तलवारीने केक कापल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या टोळीने फक्त केकच कापला नाही तर हा केक कापत असताना धिंगाणा घातलाय. आरडाओरडा करत शांतता भंग केली आहे. परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पुणे शहरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते. सहकार नगर पोलिसांचा त्यांच्या हद्दीतील गुंडांवर वचक राहिला की नाही ? असा प्रश्न पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. आता या प्रकरणात काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. तसेच सहकार नगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.