आता वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा वाहनांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे होणार कारवाई

Pune News : वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वाहनांवर कॅमेरे बसवण्यात आले आहे.

आता वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा वाहनांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे होणार कारवाई
pune traffic policeImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:22 PM

योगेश बोरसे, पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक पोलिसांना आपली ओळख दाखवण्याचे काम अनेक जण करतात. मग राजकीय नेत्याची किंवा मोठ्या अधिकाऱ्याची ओळख दाखवून दंड भरण्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आता हा फंडा चालणार नाही. तुमची ओळख कमी येणार नाही. पुणे पोलीस तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या वाहनांवर कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई होणार आहे. यामुळे आता वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा दंड भरुन द्या, हाच पर्याय वाहन धारकांपुढे असणार आहे.

कशी होणार कारवाई

पुणे पोलीस दलातील पोलिसांच्या वाहनांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे चालकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पोलिसांच्या वाहनांवर बसविलेल्या आधुनिक कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नियम मोडल्यानंतर वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ लाख ३४ हजार ६३१ वाहनचालकांवर मागील वर्षात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

किती वाहनांवर बसणार कॅमेरे

पहिल्या टप्प्यात दहा शासकीय वाहनांमध्ये कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्याद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर वाहनांवर कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. वाहतूक नियम मोडल्यामुळेच अपघात वाढत असतात. मागील वर्षी पुणे शहरात ३१५ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच ४५२ जण गंभीर जखमी झाले होते. तसेच ६० किरकोळ अपघातांची नोंद करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

२०१९ पासून किती जणांचा मृत्यू

पुणे शहर दुचाकीचे शहर आहे. पुणे शहरात २०१९ पासून आत्तापर्यंत १११८ जणांचा अपघाती मृत्यू झाला. या वर्षात आत्तापर्यंत पुणे शहरात १८० अपघातात १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील अपघाताचे ब्लॅक स्पॉट कोणते?

  1. आयबीएम कंपनी
  2. संचेती चौक
  3. माई मंगेशकर हॉस्पिटल चौक
  4. डुक्करखिंड रोड
  5. मुठा नदी पुल रोड
  6. खडीमशीन चौक
  7. संगमवाडी पार्किंग
  8. मुंढवा रेल्वे ब्रीज
  9. भूमकर चौक
  10. नवले पुल
  11. टाटा गार्ड रूम चौक
  12. ५०९ चौक
  13. कात्रज चौक
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.