Pune accident : कारला धडकला गॅसचा टँकर; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
टँकरमध्ये प्रोपिलिन गॅस (Propylene gas) असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची भीषणता संबंधित फोटो आणि व्हिडिओवरून लक्षात येते. याठिकाणी टँकरचा आकार मोठा असल्याने त्यानेच रस्ता व्यापून गेला होता. तर कारचा चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर (Mumbai-Pune expressway) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गॅस टँकर विरूद्ध बाजूला कारला धडकला. त्यात या कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. खोपोली एक्झिटजवळ या अपघाताची घटना घडली. टँकर पुणे लेनवरून मुंबई लेनमध्ये जाऊन एका कारला ठोकरल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर खोपोली पोलीस, आयआरबी, देवदुत यंत्रणा अपघात स्थळी दाखल झाली आहे. तर टँकरमध्ये प्रोपिलिन गॅस (Propylene gas) असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची भीषणता संबंधित फोटो आणि व्हिडिओवरून लक्षात येते. याठिकाणी टँकरचा आकार मोठा असल्याने त्यानेच रस्ता व्यापून गेला होता. तर कारचा चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले.
सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती नाही
बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे. सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. अपघातानंतर टँकर आडवा झाला होता. क्रेनच्या सहाय्याने तो उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशामन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज होते.
टँकरचा चालकदेखील गंभीर जखमी
या अपघातात गॅस टँकरचा चालकदेखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर, महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशामन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे, महामार्गांवरील नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.