नाना पटोले यांना मांजर आडवी गेली, पुणे शहरध्यक्षांनी काय केले पाहा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात होते. त्यावेळी काँग्रेस भवनाच्या गेटवर एक मांजर आली होती. ही मांजर नेमकी नाना पटोले बाहेर पडत असताना त्यांच्या मार्गावर आली.

नाना पटोले यांना मांजर आडवी गेली, पुणे शहरध्यक्षांनी काय केले पाहा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 1:36 PM

पुणे : काँग्रेसने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. कसबा पेठेत काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे नाव निश्चित झाले आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत उमेदवारीची घोषणा केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे शहरात ठाण मांडून आहेत. यावेळी एका मांजरीने केलाला प्रताप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांची उडालेली धावपळ पाहण्यास मिळाली. आपण विज्ञानाच्या युगात आहोत. यामुळे अंधश्रद्धेला वाव नाही. परंतु राजकारणात अनेक जण अजून अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर आलेले नाही. त्याची पुनरावृत्ती पुणे शहरात दिसून आली.

नेमके काय झाले

हे सुद्धा वाचा

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकबाबत चर्चा करण्यासाठी नाना पटोले पुणे येथील काँग्रेस भवनात आले होते. या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि इतर पदाधिकारी आले होते. काँग्रेस भवनाच्या गेटवर एक मांजर आली होती. ही मांजर नेमकी नाना पटोले बाहेर पडत असताना त्यांच्या मार्गावर आली. ती पटोले यांना आडवी जाऊ नये म्हणून अरविंद शिंदे यांनी तिला तिथून हाकलून लावलं. मग या गोष्टीची चर्चा होणारच. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे.

नाना पटोले यांचे ट्विट

नाना पटोले यांनी ट्विट करून रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे. उमदेवारी अर्ज भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे धंगेकर आजच हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं कालच नाना पटोले यांनी फोनवरून सांगितल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काल रात्री नाना पटोलेंचा मला फोन आला. यावेळी त्यांनी तयारी करा, फॉर्म भरा असे आदेश दिले. त्यामुळे मी आज वरिष्ठाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं धंगेकर यांनी सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.