मावळ – पुणे जिल्ह्यातील मावळ(Mawal) तालुक्यात एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवत इतर वाहनांना ठोकर दिल्याची घटना घडली आहे. रस्ता निमुळता असल्यानं इतर वाहनाना याची जोरात ठोकर बसत , नुकसान झाले आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV) झाली आहे. टेम्पो चालकाने रिव्हर्स गाडी चालवण्यापूर्वी एका व्यक्तीला टेम्पोची धडक (Tempo Accident) दिली होती. त्या धडकेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र या घटनेमुळे नागरिक आपल्याला मारतील या भीतीने टेम्पो चालकाने हे कृत्य केले. रिव्हर्स गाडी चालविल्याने अनेक वाहनाचे नुकसान झाले आहे.
टेम्पो चालकाचा थरार! वेगात रिव्हर्स टेम्पो चालवत इतर वाहने ठोकली; घटना सीसीव्हीटीत कैद #Pune #Crime pic.twitter.com/NdqaSmzbAW
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2022
नागरिकांची उडाली तारांबळ
अचानक टेम्पो रिव्हर्स आल्याने जीव वाचवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. टेम्पो रिव्हर्स गाडीच्या वेगात सायकलस्वारसह अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?
Women’s World Cup : वेस्ट इंडिजची पॉवरफुल सुरूवात, भारताकडून इंडिजची धुलाई
‘हा’ माझा बायको पार्वती… पत्नीला पुरुषांचं जननेंद्रिय, फसवणुकीचा दावा करत नवरा सुप्रीम कोर्टात