पुणे विद्यापीठाचा देशात डंका! संरक्षण विभागात स्थापन होणार ‘चेअर ऑफ एक्सलन्स’

राष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, सोबतच लष्कराची धोरणं, राष्ट्रीय सुरक्षेपुढची आव्हानं, देशाची युद्धनीती, याबाबत राष्ट्रीय पातळीवर अभ्यास व्हावा आणि त्याचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने देशभरातल्या विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवले होते. तब्बल १०० हून अधिक विद्यापीठांकडून यासाठी अर्ज करण्यात आले होते.

पुणे विद्यापीठाचा देशात डंका! संरक्षण विभागात स्थापन होणार 'चेअर ऑफ एक्सलन्स'
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 12:05 PM

पुणे : शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उपक्रमांमध्ये देशात महत्वाची संस्था म्हणून ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (Savitribai Phule Pune University )आता राष्ट्रीय पातळीवर एक मोठा बहुमान मिळाला आहे. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात (Defence and Strategic Studies) केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून (Defence Ministry) ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ (Chair of Excellence) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी २ कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे. (Chair of Excellence will be established in the Department of Defence and Strategic Studies in Savitribai Phule University of Pune)

१०० विद्यापीठांकडून मंत्रालयाला प्रस्ताव

राष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, सोबतच लष्कराची धोरणं, राष्ट्रीय सुरक्षेपुढची आव्हानं, देशाची युद्धनीती, याबाबत राष्ट्रीय पातळीवर अभ्यास व्हावा आणि त्याचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने देशभरातल्या विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवले होते. तब्बल १०० हून अधिक विद्यापीठांकडून यासाठी अर्ज करण्यात आले होते.

बहुमान मिळवणारा देशातला पहिला विभाग

संरक्षण विभागाला आलेल्या सर्व प्रस्तावांमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक विभाग आणि विद्यापीठाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी लक्षात घेता पुणे विद्यापीठात ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. अशाप्रकाने मान मिळवणारा पुणे विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिक विभाग देशातला पहिला आणि एकमेव विभाग आहे.

संरक्षण विषयात संशोधन करणाऱ्यांना मोठी संधी

लष्कर, वायूसेना आणि संरक्षण मंत्रालयाच्या समन्वयाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ची स्थापन करण्यात येणार आहे. भविष्यात भारतीय नौदलासोबतही चेअर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्याबद्दलचा प्रस्तावही नौदल मुख्यालयाला पाठवण्यात आला आहे. विद्यापीठात संरक्षण मंत्रालयाकडून ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ मिळाल्यामुळे या विषयांत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या :

MPSC चा विद्यार्थ्यांसाठी ॲलर्ट, राज्यसेवा, वनसेवेसेह अभियांत्रिकी परीक्षेतील पदांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याचं आवाहन

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....