AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking : महापालिका निवडणुका कधी होणार?; चंद्रकांत पाटील यांनी थेट महिनाच सांगितला

माजी मंत्री आदित्य ठाकरे राज्याचा दौरा काढणार आहे. त्यावरून त्यांनी टोले लगावले. ज्यावेळी सत्ता होती तेव्हा सूचलं नाही आणि आता हे करत आहेत, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला. आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी टीका केली.

Big Breaking : महापालिका निवडणुका कधी होणार?; चंद्रकांत पाटील यांनी थेट महिनाच सांगितला
chandrakant patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 12:26 PM

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकही नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या प्रशासक भरोसे चालला आहे. राजकारण्यांकडूनही या निवडणुकांबाबतची कोणतीच माहिती दिली जात नाहीये. मात्र, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. एवढेच नव्हे तर या निवडणुका कोणत्या महिन्यात होऊ शकतात याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

चंद्रकांत पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील? असा सवाल करण्यात आला. त्यावर आज त्याबाबत सुनावणी आहे. पण मला अजूनही वाटतं की या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच्याच वर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

असंवेदनशीलपणाचं ठरेल

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपमध्ये तीन नावांची चर्चा आहे. त्याबाबत पाटील यांना छेडण्यात आलं असता पाटील यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. आज बापट साहेबांचा 13वा आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी देणार? कोण येणार? हे आता बोलणे असंवेदनशील असेल, असं त्यांनी सांगितलं.

जुन्या वाड्याचा प्रश्न मार्गी लावू

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील जुन्या वाड्यांची पाहणी केली. प्रामुख्याने जे मूळ पुणे आहे. त्या ठिकाणी शनिवार वाड्याभोवती असलेल्या वाड्यांचा मुद्दा प्रलंबित आहे. पुण्यातील चार ठिकाणी अजूनही असेच प्रश्न आहेत. या वाड्याचे प्रश्न लवकरच मार्गी लागतात. येत्या काळात दिल्लीत पुरातत्त्व खात्याशी बैठक घेऊ. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुढाकार घेऊन या संदर्भात आढावा बैठक घेत आहेत. डीसी नियम बदलायला काही लागत नाही. राज्यकर्ता जर कन्व्हिन्स असेल तर काही करता येईल. पण पुरातत्त्व विभागाशी बोलायला लागेल, असं ते म्हणाले.

डिग्री चार वर्षाची

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या डिग्रीवरही भाष्य केलं. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स राहतीलच. पण आता डिग्रीचे तीन वर्ष नाही चार वर्ष असतील. दोन वर्षाचा डिग्री कोर्स घेऊन बाहेर पडता येईल. ते क्रेडिट डिजिटल लॉकर रूममध्ये मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली.

ड्रोनने पंचनामे

राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. याबाबत एकतर कायम स्वरुपी कायदा कॅबिनेटमध्ये केला आहे. नुकसान भरपाईचा रेट ठरला आहे. नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश आता जिल्हाधिकारी देतील. ड्रोनच्या मदतीने पंचनामा केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.