धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा?; चंद्रकांतदादांनी दिली देशभरातील उदाहरणं
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे प्रकरणात दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला. (Chandrakant Patil demand resignation of dhananjay munde)
पुणे: रेणू शर्मा आणि करुणा शर्मा ही दोन प्रकरणं वेगळी आहेत. रेणू शर्मा प्रकरणाची चौकशी सुरूच राहील. पण करुणा शर्माप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ही मागणी करताना महाराष्ट्रासह देशभरातील मंत्र्यांना कसा राजीनामा द्यावा लागला होता, याची उदाहरणच चंद्रकांतदादांनी सादर केली. (Chandrakant Patil demand resignation of dhananjay munde)
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे प्रकरणात दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला. दोन वेगवेगळ्या प्रकरणाची गल्लत केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा प्रकारची प्रकरणे घडल्यानंतर त्यावेळच्या माजी मंत्र्यांनी नैतिकतेच्या कारणास्तव कसा राजीनामा दिला होता, याची उदाहरणच त्यांनी मांडली.
1984मध्ये माजी मंत्री रामराव आदिक यांनी विमानातून प्रवास करताना एका हवाईसुंदरीचा हात धरला होता. त्यावेळी त्यांना 14 मंत्र्यांनी साथ दिली होती. पण दबाव वाढल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. माजी राज्यपाल एन. डी. तिवारी यांची तीन महिला मसाज करत असल्याची व्हिडीओ फीत व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजस्थानचे मंत्री महिपाल मदेरणा यांना नर्स असलेल्या भंवरी देवींचे अपहरण केल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. तर, राजस्थानचेच मंत्री बाबूलाल नागर यांना बलात्कारप्रकरणी घरी बसावे लागले होते. आपचे समाजकल्याण मंत्री संदीप कुमार यांचीही अश्लील सीडी व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याने आरोप केल्याने अकबर यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून हीच नैतिकता अपेक्षित आहे, असं सांगतानाच मुंडे यांच्या राजीनाम्यावर आम्ही ठाम आहोत, असं त्यांनी सांगितलं.
सोमवारपासून आंदोलन
अशा प्रकारच्या चुका झाल्या तर राजीनामा देणं हेच चांगलं असतं. राजकारणात आतापर्यंत असंच झालं आहे, असं सांगतानाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास सोमवारपासून तहसिल कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. महिला मोर्चाकडून ही निदर्शने होतील. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने तहसीलदार आणि कलेक्टरला निवेदन देण्यात येईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
पवारांनी घुमजाव का केलं कळलं नाही
करुणा शर्मा प्रकरणी मुंडेंनी कबुली दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अशा प्रकरणात कडक धोरण घेत असतात. ते कुणालाही पाठिशी घालत नाहीत. पण काल त्यांची पीसी ऐकून सर्वांचा भ्रम निरास झाला. पवारांनी घुमजाव का केलं हे कळलं नाही, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकारांचे नातू आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत. ते मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत हे सुद्धा अनाकलनीय आहे, असंही ते म्हणाले. मुंडेंनी करुणा शर्मा प्रकरणात कबुली दिली हा त्यांचा चांगुलपणा आहे. पण कबुली दिली म्हणजे चूक आहे ती चूक नाही, असं म्हणता येत नाही, असंही ते म्हणाले. (Chandrakant Patil demand resignation of dhananjay munde)
मी कुठेही धनंजय मुंडेंच्या पक्षाचा, पदाचा उल्लेख केला नाही, मला कोणाचेही राजकीय करिअर खराब करायचे नाही : रेणू शर्मा#DhananjayMunde #RenuSharmahttps://t.co/gMgIWYrlPa
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2021
संबंधित बातम्या:
LIVE | धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचा भ्रमनिरास : चंद्रकांत पाटील
धनंजय मुंडे समर्थक सहकुटुंब मुंबईत, चित्रकूट बंगल्यावर पुन्हा गर्दी
(Chandrakant Patil demand resignation of dhananjay munde)