पुणे: कोरोनामुळे दीड वर्ष वाया गेलं आहे. कोरोना आधी तीन वर्ष नगरसेवकांना काम करण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. आता फक्त सहा महिनेच उरले आहेत. त्यामुळे खुर्ची टाकून बसा. हातात काठी घेऊन काम करा. तरच सत्तेत याल, असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. (chandrakant patil reaction on pune corporation election)
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना हे आदेश दिले. आता सहा महिने तुमच्या हातात आहे. या सहा महिन्यात जिद्द दाखवा. खुर्ची टाकून बसा. गटर, पाणी, ड्रेनेज यात अडकून पडू नका. मुंबईनंतर पुण्याला चांगलं काम करा. हातात काठी घेऊन काम करा. सहा महिन्यात खूप काही करता येते. फार मोठा काळ आहे. चांगलं काम केलं तर नागरिक मतदान करतील. त्यामुळे पुन्हा सत्तेत याल, असं पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी शेलक्या शब्दात शिवसेनेवर टीका केली. ब्रिटिशांनी मुंबईत सगळं केलं. म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला. राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. शिवसेनेनं मुंबईत काय केलं? त्या आधी पालिकेत काँग्रेसची सत्ता होती, असा टोला त्यांनी हाणला.
शहरात मोठी वाहतूक कोंडी आहे. मीही वाहतूक कोंडीत अडकलो आणि कोरोना नाही काय की असं वाटलं. कारण गर्दी तेवढी होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यासाठी सहकार्य केलं. आता तिसरी लाट येऊ नये म्हणून सहकार्य करा. मात्र पुणेकर सर्व विसरून जातात. तिसरी लाट येऊ नये म्हणून बेफिकीरी कमी केली पाहिजे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. उड्डाण पुलांचा उपयोग चांगला होतो. उड्डाण पुलांची पहिली कल्पना ही नितीन गडकरींचीच. 1995-99 या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबईत उड्डाणपूल तयार केले. ते उड्डाण पुलांचे जनक मानले जातात. त्यांनी 55 उड्डाण पूल बांधून मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्ततात केली. या उड्डाण पुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (chandrakant patil reaction on pune corporation election)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7.30 AM | 10 June 2021https://t.co/SPrmCv1eJS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2021
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांनो, 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा, कृषी विभागाचं आवाहन, 5 दिवस धुवाँधार पावसाचे
सेवेत असो की निवृत्त, पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार, ठाकरे सरकारचं जम्बो प्लॅनिंग
(chandrakant patil reaction on pune corporation election)