राज ठाकरे म्हणतात, ओबीसींच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव; चंद्रकांतदादा म्हणाले, राज म्हणतात ते बरोबर!

ओबीसी आरक्षणाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (chandrakant patil supports mns chief raj thackeray statement)

राज ठाकरे म्हणतात, ओबीसींच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव; चंद्रकांतदादा म्हणाले, राज म्हणतात ते बरोबर!
राज ठाकरे, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 6:10 PM

पुणे: ओबीसी आरक्षणाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ का काढता?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. (chandrakant patil supports mns chief raj thackeray statement)

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे. तुम्ही लगेच वेगळा अर्थ काढता. ओबीसी आरक्षणावर एक महिन्यात निर्णय येऊ शकतो. ओबीसींच शिक्षणातलं आरक्षण गेलं नाही. राजकीय आरक्षण गेलंय. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे, कारण त्यांना आरक्षणाच्या नावाखाली निवडणूका पुढे ढकलायच्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूका हरणार म्हणून ते निवडणूका पुढे ढकलत आहेत. राज ठाकरे आता बोलायला लागलेत. अण्णा हजारे बोलायला लागले आहेत. अशा ताकदी रस्त्यावर उतरल्याशिवाय याचा खोटारडेपणा बाहेर येणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.

कोणत्याही मोठ्या पक्षाबरोबर युती नाही

विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपने आपली संघटनात्मक ताकद वाढली आहे. आम्ही सहयोगी पक्षाला घेऊन निवडणूका लढणार आहोत. आम्ही मोठ्या पक्षासोबत युती करणार नाही. कारण पुढच्या निवडणूका या ताकदीवर लढवायच्या आहेत, असं ते म्हणाले.

शेट्टी आक्रमक का झाले?

यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राजू शेट्टी आक्रमक झालेत. का होऊ नये त्यांनी आक्रमक? जयंत पाटील म्हणाले होते की, पंचनामे झाले की मदत देऊ. देवेंद्रजींनी तर पंचनामे न करता मदत दिली होती, असं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन वाढवणार असाल तर मान्य. मात्र ही गरीब खाणार काय? आहे हे देईनात मात्र वाढवून कधी द्यायचे, असा सवालही त्यांनी केला.

तक्रारी सुरू करा

मी खंजीर खूपसलं असं विधान केलं. ते त्यांना जरा झोंबलं. ते कोथळा काढतो असं म्हणाले याविरुद्ध पोलीसात तक्रारी सुरू करा. नारायण राणे थोबाडीत मारतो म्हणाले तर कारवाई केली. मग आम्ही काय मेलेल्या आईचं दूधं प्यायलेलो नाही. आमच्यासोबत विश्वासघात झाला हे आम्ही म्हणायचे नाही का? तुम्ही आम्हाला काय म्हणायचं त्याची स्क्रीप्ट द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवारांवर फक्त पुस्तक यायचं बाकी

आमचं म्हणणं शिवसेनेविषयी होतं. शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आहे. 2014 ला संजय राऊतांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हे जगजाहीर आहे. 145 चा आकडा करण्याचे शिल्पकार हे संजय राऊत आहेत. राऊतांनी हे सरकार बनवलं आहे. राष्ट्रवादी भाजपची एका एका पंचायत समिती खातं आहे. काँग्रेस नसल्यात जमा आहे, असं सांगतानाच शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे. तरीही ते म्हणतात, खंजीर खूपसलं नाही. वसंतराव पाटलांच काय झालं?; असा सवाल त्यांनी केला. (chandrakant patil supports mns chief raj thackeray statement)

संबंधित बातम्या:

तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, सरकारलाच आता निवडणुका नकोय; राज ठाकरेंचा हल्लाबोल

शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो; राऊतांचं चंद्रकांतदादांना ओपन चॅलेंज

(chandrakant patil supports mns chief raj thackeray statement)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.