तुमच्याकडं गृह खातं, भाजपचं पितळ उघडं पाडण्याच्या भाषेऐवजी करा ना काय करायचे ते, चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान
भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केलीय. नवाब मलिक कौटुंबिक कारणामुळं चुकीचे आरोप करत आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केलाय.
पुणे: भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केलीय. नवाब मलिक कौटुंबिक कारणामुळं चुकीचे आरोप करत आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केलाय. मलिक यांनी वैयक्तिक कारणासांठी महाराष्ट्राला वेठीस धरु नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडं गृह खातं असून त्यांनी भाजपचं पितळ उघडं पाडण्याचं वक्तव्य करण्याऐवजी काय करायचे ते करावं, असं आव्हान चंद्रशेकर बावनकुळे यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादीला आव्हान दिलंय.
गृहखातं तुमच्याकडं करायचे ते करा
भाजपाचे पितळ उघडं पाडण्याची भाषा करणा-यांचे सरकार दोन वर्षापासुन राज्यात आहे ” करा ना काय करायचे ते ” तुमच्या हातात तपास यंत्रणा आहे गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे वाट कशाची पहाता असा सवाल बावनकुळे यांनी नबाब मलिकांना आव्हान दिलंय.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नबाब मलिकांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाल्याच्या रागातून ते चुकीची माहिती पसरवत आहेत. नवीन पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून काढण्याचे सोडून कारवाई करणा-या आधिका-यांना वैयक्तिक पातळीवर टार्गेट केलं जातंय, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. राज्य सरकारचा दुरपयोग केला जातोय.
नबाब मलिकांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाल्याने मलिक फस्टट्रेशनमध्ये जाऊन बोलत असल्याचा गंभीर आरोप माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.बावनकुळे पुण्ाचीस आंबेगाव तालुक्याच्या दौ-यावर आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते
चांगल्या अधिकाऱ्यावर आरोप
महाविकास आघाडी सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर करुन चांगल्या आधिका-यांवर चुकीचे आरोप करण्याचे काम केले जातेयय जातीवाद,कुटुंबातील वाद ,यातुन तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. नबाब मलिकांच्या जावयाच्या कारवाईनंतर कुटुंबातील अंतरकलह वाढल्याने त्यांच्याकडून आरोप सुरु असल्याचे सांगात माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मलिकांना चिमटा काढलाय.
इतर बातम्या:
वानखेडे स्टेडियमवर आता ‘गावस्करांचा बॉक्स’ आणि ‘वेंगसरकरांचा स्टँड’, उद्घाटनाअगोदरचे Exclusive photo
महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा
Chandrashekhar Bawankule gave challenge to NCP and Nawab Malik to take action against BJP