Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपक्ष लढण्यापासून स्वराज्य संघटनेच्या स्थापनेपर्यंत! छत्रपती संंभाजीराजेंनी सांगितलेले TOP 9 मुद्दे

पुढील निवडणुकीला अपक्ष सामोरं जाणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. यासोबत त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केलंय.

अपक्ष लढण्यापासून स्वराज्य संघटनेच्या स्थापनेपर्यंत! छत्रपती संंभाजीराजेंनी सांगितलेले TOP 9 मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 12:52 PM

पुणे : खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. राज्यसभेची (Rajya Sabha) निवडणूक लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केला. त्यासोबत या निवडणुकीला अपक्ष सामोरं जाणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. यासोबत त्यांनी स्वराज्य (Swarajya) नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केलंय. या संघटनेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्यांचं म्हटलंय. संभाजी राजे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलेले 9 महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे-

  1.  राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजी राजेंची खासदारकीचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल काय असणार हे स्पष्ट झालं आहे.
  2. जुलैमध्ये राज्यसभेच्या सहा जागा खाली होणार आहेत. त्यापैकी एका जागेवर छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
  3.  याआधी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी दिल्याबद्दल संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवासांचेही आभार मानले.
  4. अपक्ष निवडणूक लढवण्यासोबत यावेळी राजकीय संघटनेचे सूतोवाच संभाजीराजेंनी दिले. स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणा यावेळी संभाजीराजे यांनी केली.
  5. स्वराज्य संघटना येत्या काळात राजकारणातही सक्रिय होऊ शकते, असेही संकेत छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहेत.
  6. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत.अपक्ष लढवण्याचा निर्णय का घेतला, याचंही उत्तर छत्रपती संभाजीराजे यांनी दिलं. छत्रपतींच्या नावानं आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावानं जे राजकीय पक्षा चर्चा करतात त्यांची भूमिका छत्रपतींच्या घराण्यातील वंशजाबद्दल कशी असते, हे आता कळेल, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय.
  7. भलेही भाजपकडून प्रेरीत असल्याचा ठपका छत्रपती संभाजीराजे यांच्यावर लावला जात असला तरिही योग्य वाटल्यानंतर मी महाविकास आघाडीची बाजू घेतल्याचं विधान संभाजीराजे यांनी केलंय.
  8. राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आपण स्वराज्य संघटनेच्या स्थापनेचा आणि अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय.
  9. छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता राज्यसभा निवडणुकीच्या समीकरणातही चुरस पाहायला मिळणार आहे.

'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.