छगन भुजबळ धमकी प्रकरणात ट्विस्ट, त्याने ‘या’ मोठ्या नेत्यांनाही केले धमकीचे कॉल

Pune Crime News : पुणे पोलिसांनी छगन भुजबळ धमकी प्रकरणात एका आरोपीस अटक केली आहे. त्या आरोपीने फक्त छगन भुजबळ यांनाच धमकी दिली नाही तर इतर नेत्यांनाही धमकीचे फोन केले होते.

छगन भुजबळ धमकी प्रकरणात ट्विस्ट, त्याने 'या' मोठ्या नेत्यांनाही केले धमकीचे कॉल
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 5:38 PM

प्रदीप कापसे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ घेत सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली. भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करुन ही धमकी देण्यात आली. फोनवर भुजबळ यांना मारण्यासाठी आपणास सुपारी मिळाली आहे, असे फोन करणाऱ्याने सांगितले. त्यांना उद्याच आपण मारणार असल्याचे त्याने सांगितले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. परंतु अशा धमकीचा फोन त्या व्यक्तीने फक्त भुजबळ यांनाच केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनाही केला.

कोणाकोणला मिळाली धमकी

छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने फक्त भुजबळ यांनाच धमकी दिली नाही तर शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी दिली. रात्री बारा वाजता त्यांना कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने दिलीप वळसे पाटील यांनाही कॉल केला. मात्र दिलीप वळसे पाटील यांचा कॉल उचलला गेला नाही.

हे सुद्धा वाचा

का दिली धमकी

आरोपीने धमकीचा फोन केल्यानंतर 50 लाख रुपयांची मागणी केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दारूच्या नशेत सगळ्यांना संपर्क करण्याचा तो प्रयत्न करत होता. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी दिली. त्याला महाडमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 1 युनिटनं अटक केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.