राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही, आम्ही त्यांना उशिरा कळवलं; भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण
सावित्रीबाई फुले विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आलेलं आहे.
पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. आम्हीच त्यांना उशिरा कळवलं होतं, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. 3 तारखेला जयंतीदिनी आज अनावरण करावं हा आमचा प्रयत्न होता. पण एक महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काम अर्धवट राहिलं. त्यामुळे राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हतं. काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिल आणि काम पूर्ण झालं नसतं तर? राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवलं, काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती, असं ते म्हणाले. आता 9 तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल. आणखी 8 दिवस मिळताहेत चांगलं काम करू. राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते. 2 ते 4 दिवसांनी राज्यपाल येतील त्याने काही फरक पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
राणेंकडून अपेक्षा उंचावल्यात
मी सगळ्यांना पुरुन उरलोय, या केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. नारायण राणे मोठ्या पदावर आहेत, ते केंद्राचे मंत्री आहेत.राज्य शासनाचे 50 हजार कोटी केंद्राकडे अडकून पडलेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्याकडून फार अपेक्षा उंचावल्या आहेत. मोठ्या योजना त्यांनी राज्यासाठी आणाव्यात, असा टोला भुजबळांनी राणेंना लगावला आहे.
12 कोटी जनतेची जनगणना करायचीय, एका गावाची नाही
यावेळी भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आवश्यक असलेली सर्व पूर्तता शासनाच्या वतीने केलेली आहे. एका गावाची जनगणना करायची नाही, 12 कोटी जनतेची करायची आहे. कोरोनाच्या काळात लोकांनी घरोघरी जाऊन जनगणना करावी अशी इच्छा असेल तर ते लोकांसाठी अन्यायकारक असेल. आरक्षण टिकलं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे, असंही ते म्हणाले. एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय. अशावेळी लॉकडाउन करावा अशी माझीही इच्छा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 3 January 2022https://t.co/nFEN1WEgD7#News | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2022
संबंधित बातम्या: