पुणे चांदणी चौक लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्र्यांची दांडी? राजकीय चर्चांना सुरुवात, कोल्ड वॉर की अन्य कारण

chandni chowk bridge inauguration : पुणे शहरातील चांदणी चौक परिसर वाहतूक कोंडी आजपासून सुटणार आहे. शनिवारी चांदणी चौक पुलाचे उद्घाटन होणार आहे. परंतु या समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याचे वृत्त आले आहे.

पुणे चांदणी चौक लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्र्यांची दांडी? राजकीय चर्चांना सुरुवात, कोल्ड वॉर की अन्य कारण
chandni chowk bridge
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 8:13 AM

योगेश बोरसे, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उडड्णपुलाचे लोकर्पण शनिवारी होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी या पुलाचे उद्घाटन करणार आहेत. या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्र्यांना बसला होता वाहतूक कोंडीचा फटका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौक समारंभाला येणार नसल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दहा महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. ते साताऱ्याकडे जात असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी पुणेकरांनी ही समस्या त्यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता तेच समारंभाला येणार नसल्याचे वृत्त आहे.

का येणार नाही मुख्यमंत्री ?

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांनी समारंभाला  न येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

हे ही आहे कारण ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी आहेत. यामुळे ते त्याच ठिकाणी थांबणार आहे. उड्डाणपूलाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री प्रमुख अतिथी होते. परंतु त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल केला आहे. मुख्यमंत्री येणार नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीचे शक्तीप्रदर्शन

चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने महायुतीचं शक्तीप्रदर्शन होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी काही हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी व्हिआयपींसाठीची बैठक व्यवस्था वेगळी आहे. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे. या माध्यमातून सरकारने आतापर्यंत काम कसं केलं त्याचे प्रेझेंटेशन केले जाणार आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.