Kashmir Files Actor : पुण्यात आशिष शेलारांना ‘फारुख मलिक बिट्टाची’ भीती; चिन्मय मांडलेकरला म्हणाले, …तर माझं काय होईल?
चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांची वाढती पसंती पाहून त्यांना राजकारणात (Politics) न येण्याचा सल्ला भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे अभिनेते चिन्मय मांडलेकर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आले होते.
पुणे : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांची वाढती पसंती पाहून त्यांना राजकारणात (Politics) न येण्याचा सल्ला भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. चिन्मय मांडलेकर हे माझ्या लोकसभा मतदारसंघात राहतात. तुम्ही जर त्यांना सुचवले आणि ते राजकारणात आले, तर माझं काय होईल, म्हणून तुम्ही राजकारण क्षेत्रात येऊ नका. किमान ते क्षेत्र तरी माझ्यासाठी शिल्लक असू द्या, असा सल्ला आशिष शेलार यांनी चिन्मय मांडलेकर यांना दिला आहे. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्याशी मुक्त संवाद तसेच सत्कार कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आले होते. यावेळी आशिष शेलार यांच्यातर्फे चिन्मय मांडलेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शेलार बोलत होते.
‘ते राहत असलेले मतदारसंघाचे क्षेत्र माझे’
शेलार म्हणाले, की अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना पसंत करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या प्रसिद्धीच्या भरात कोणी त्यांना रादकारणात जाण्याचा सल्ला देऊ नये. कारण ते राहतात, ते मतदारसंघाचे क्षेत्र माझे आहे. मांडलेकर पटकथा, संवाद, दिग्दर्शन, लेखन यासह अभिनयही तुम्ही करता. एकाचवेळी अनेक कामे तुम्ही सहज करता. आता क्षेत्र राहिले आहे कोणते? किमान राजकारण तरी आमच्यासाठी सोडा, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
#Pune : पुण्यात आशिष शेलारांना ‘फारुख मलिक बिट्टाची’ भीती; चिन्मय मांडलेकरला म्हणाले, …तर माझं काय होईल? पाहा व्हिडिओ – @ShelarAshish #chinmaymandlekar #ashishshelar #kashmirifiles अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/X9p7fJ6dtL
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2022
‘संवेदनशील मनाच्या माणसांची राजकारणात गरज’
राजकारणात संवेदनशील मनाच्या माणसांची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. मनाच्या संवेदना जेव्हा कमी बोलायला लागतात, तेव्हा भोंग्यांच्या आवाजावरून स्पर्धा सुरू होते. त्यामुळे संवेदनशील मनाच्या व्यक्तीने समाजकारणात, राजकारणात असायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.