Chitra Wagh : मदत करणं हे जर चूक असेल तर मी ही चूक केलीय, चित्रा वाघ म्हणतात पोलिसांनी माझा सीडीआर…

चित्रा वाघ म्हणाल्या, एक मुलगी एकटी लढत होती, तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आली. एखादी मुलगी पुराव्यासहीत सांगत आहे, मला काय माहिती कुठलं हॉस्पिटल कुठे आणि काय? ही माहिती सर्व त्या मुलीने मला दिली. ती एकटी आहे म्हणून मी तिच्यासोबत उभा राहिली ही चूक आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Chitra Wagh : मदत करणं हे जर चूक असेल तर मी ही चूक केलीय, चित्रा वाघ म्हणतात पोलिसांनी माझा सीडीआर...
चित्रा वाघ यांनी आरोप फेटाळलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:49 PM

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या प्रकरणात आता खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. पीडित तरुणीने आता थेट भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आणि चित्रा वाघ यांनी मला खोटे आरोप करायला लावले असे म्हटले आहे. हे आरोप फेटाळताना चित्रा वाघ म्हणाल्या, एक मुलगी एकटी लढत होती, तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आली. एखादी मुलगी पुराव्यासहीत सांगत आहे, मला काय माहिती कुठलं हॉस्पिटल कुठे आणि काय? ही माहिती सर्व त्या मुलीने मला दिली. ती एकटी आहे म्हणून मी तिच्यासोबत उभा राहिली ही चूक आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच पोलीस (Pune Police) कसा त्रास देत आहेत हेही सांगितलं. परवा तिला चालता येत नव्हतं, मी डॉक्टरांना तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं. मी सांगितलं ससूनला जायचं आहे, तर ती जाहंगीरला गेली. या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. कोणही तिच्या बरोबर नव्हतं मी एकटी लढली आणि आज माझ्यावर खोटे आरोप करतात. असे त्या म्हणाल्या.

माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न

तसेच ती कुठल्या मजबुरीत का हे करते आहे हे मला माहिती नाही. आणि हे सगळं करून माझा आवाज बंद होणार नाही. मला केसमध्ये अडकण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र माझी सर्व तयारी आहे. माझ्या घरावरही हल्ले झाले. माझा सीडीआर रिपोर्टही पोलीस काढू शकतात, असे थेट आव्हान चित्रा वाघ यांनी दिले आहे. तसेच पीडितेचा मेसेज मी तसाच्या तसा गृहमंत्र्यांना पाठवला, असेही त्यांनी सांगितलं. त्या मुलीलीवर दबाव आणला असेल म्हणून ती अशी बोलत असेल असेही चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात अशा प्रकारे वळण मिळालं तर इतर महिला समोर येणाही नाहीत असेही चित्रा वाघ म्हणाल्या

आधी झोपले होते का?

तसेचत राष्ट्रवादीनच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी नेते मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर या प्रकरणावरून जोरदार टीका केलीय. तर चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर आणि शेख यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही कितीही दबाव आणा मात्र आमचं काम थांबणार नाही. आम्ही अशी प्रकरणं लपू देणार नाही. असेही त्या म्हणाल्या. तसेच ती एकटी मुलगी लढली याचं मला कौतुक आहे. याच्यापुढेही माझी मदत लागली तर मी तिच्या सोबत असेन असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. फेब्रुवारीपासून ही मुलगी लढते आहे, तेव्हा हे लोकं झोपले होते का? असा सवालही यांनी केला आहे. तसेच मेहबूब शेख यांना इशारा देताना शंभरजण रोज बांधून फिरते चित्रा वाघ, माझ्या नादी लागू नका, असेही म्हणाल्या.

रघुनाथ कुचिक प्रकरणात नाट्यमय वळण! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; चित्राताई म्हणाल्या, आनंद वाटला…

INS Vikrant Case : विक्रांत घोटाळ्यात नाव येताच किरीट सोमय्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण; सोमय्या नेमकं काय म्हणाले?

INS Vikrant Case : ‘किरीट सोमय्या पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील’, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, सरकारवर निशाणा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.