चित्रा वाघ यांचे ‘ते’ ट्वीट; प्रशांत जगताप म्हणतात, “अस्मान हिरोली काही चुकीचं बोलले नाहीत”

या भाषणाचा अर्थ काय होता, हे प्रशांत जगताप यांना समजावून सांगितलं. शिवाय उस्मान हिरोली यांचं म्हणणं कसं योग्य होतं, हेही स्पष्ट करून सांगितलं.

चित्रा वाघ यांचे 'ते' ट्वीट; प्रशांत जगताप म्हणतात, अस्मान हिरोली काही चुकीचं बोलले नाहीत
प्रशांत जगताप
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 11:17 AM

पुणे : रवींद्र धगेकर हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अल्पसंख्याकांचा मेळावा पुण्यात पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं दुबई, कुवेतवरून मतदार बोलवा, असं आवाहन केलं. तो व्हिडीओ ट्वीट करत भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला पर्यायानं शरद पवार यांना टार्गेट केलं. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, चित्रा वाघ या एकेकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी हा केवीलवाणा प्रयत्न केला आहे. शहराचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांना अल्पसंख्याकाच्या मेळाव्यात भाष्य केलं. त्याचा आणि धर्माचा काही संबंध नाही. कसबा मतदारसंघातले १६५७ लोकं दुबई, मस्कात, अबुधाबी येथे मजूर किंवा इंजिनीअर म्हणून काम करतात. हा सर्व मतदार मतदानापासून वंचित राहणार आहे. हा मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा आहे.

चित्रा वाघ यांचा केवीलवाणा प्रयत्न

कसबा मतदारसंघातून आघाडीचा मतदार निवडून यायचा असेल, राज्यातलं धर्मांध वातावरण संपवायचं असेल, तर दुबई, मस्कात येथील लोकांना दोन दिवसांची सुटी घ्यावी. मतदानासाठी यावं, त्यासाठी दुबई किंवा मस्कात येथून लोकं आणा. हे राष्ट्रीय कार्य बजवा, अशाप्रकारचं आवाहन केलं. पण, यात चित्रा वाघ यांना शरद पवार यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला. हा चित्रा वाघ यांचा केवीलवाणा प्रयत्न असल्याचंही प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

पदरात पाडायचं म्हणून काहीतरी…

मोदींच्या संदर्भातील भीतीमुळं ज्यांचं धाडस मेलं. असा लोकांनासुद्धा जागृत करा. त्यांना मतदानाला आणा. अशाप्रकारचा उस्मान हिरोली यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. याचा दुरान्वयाचाही संबंध मेलेल्या लोकांशी किंवा शरद पवार यांच्या उपस्थितीशी नाही. परंतु, असा संबंध जोडण्याचा प्रयत्न चित्रा वाघ यांनी केला आहे, असं मतही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं.ज्यांना आपण बाप म्हणतो अशी नाती मरेपर्यंत जोडली पाहिजे. राजकारणात आलो म्हणून काहीतरी पदरात पाडायचं म्हणून ही नाती जोडली जाऊ नये. माझा बाप कुठला पक्ष किंवा विचारधारा बदलू शकत नाही. माझे राजकीय गुरु हे शरद पवार, अजित पवार आहेत. ते राहतील. त्यामुळे राजकीय व्यक्तींनी या बाबी गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं प्रशांत जगताप म्हणाले.

मस्कात येथून लोकं आणणार

चित्रा वाघ यांना खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. चित्रा वाघ यांनी काल ट्वीट करून राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीसाठी दुबई, मस्कात येथून लोकं आणणार आहेत. मेलेली माणसंसुद्धा आणणार आहेत, असा आरोप केला होता. यासाठी त्यांनी उस्मान हिरोली यांच्या भाषणाचा व्हिडीओ त्यांनी ट्टीट केला. पण, या भाषणाचा अर्थ काय होता, हे प्रशांत जगताप यांना समजावून सांगितलं. शिवाय उस्मान हिरोली यांचं म्हणणं कसं योग्य होतं, हेही स्पष्ट करून सांगितलं. याचे पडसाद मतदारांवर कसं होतं, ही येणारी वेळचं सांगेल.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.